Translate

Friday, November 30, 2018

Company भाग - ३

        Company भाग - ३

     मुंबई शहरातील एका नामवंत परिसरात एक अजय नावाचा मुलगा कामाला होता. तो कामाच्या ठिकाण्याहुन लांब अगदी ३ तास अंतरावर असल्याने तरीही त्याला त्याच्या कामातील साहेब कामाला लवकर बोलवत. एकदा काम जास्त असल्याने त्याला खुपवेळ थांबवले. अगदी ८:३० ते ९:१० वा.पर्यत.. मग त्याचा पगार इतका फ़ारसाही नव्ह्ता. त्यामुळे घरातील माणसे त्याला सारखे बजावुन सांगत की, तु काम सोडुन दे.. नको जाऊ कामाला ! घरीच बस ! मग एका दिवशी त्याने त्याच्या साहेबाला विचारले की, साहेब माझा पगार वाढवा.. नाहितर मला काम सोडावे लागेल.. तेव्हा हे बोलताना साहेबांनी त्याला काही पर्याय दिले..

 १) तुला जास्तीत जास्त ११ हजार रु. वाढवुन देऊ शकतो.

 २) तुला काम सोडायचे असेल तर, तुला २० दिवस अजुन काम करुन तु काय शिकला आहे. हे इतर लोकांना  शिकवायला लागेल. तेव्हा तुझा पगार आणि अनुभव अर्ज देता येईल.

३) तुला आजच काम सोडायचे असेल तर, तुला काहीच मिळणार नाही.

     तेव्हा थोडावेळ विचार करुन त्याने दुसरा पर्याय निवडला. पण संध्याकाळी झाल्यावर त्याच्या साहेबाने वेगळाच चुकीचा आरोप लावल्यामुळे त्याला काम स्वत: हुन सोडावे लागले.

No comments:

Post a Comment

Nice Blog