Translate

Friday, November 9, 2018

नदी

                                           नदी
    रायगड जिल्यातील एका लहानशा गावात राहणारा कल्पेश हा लहानपणी शहरात राहिल्यामुळे त्याला शहराची ओढ लागली होती. तो शाळेत असताना त्याला विचार आला कि आपण एकदा पाण्यात पोहायचे. मग मित्र त्याचे रानातील प्रत्येक जागा ओळखुन असल्याने त्याने विचार केला की आपण रानात फ़िरायला जायचे. मग शनिवारी ४ मित्रांनी योजणा करुन झाल्यावर रविवारी सकाळी ९ वाजता घरातुन निघाले. सोबत खाण्यासाठी थोडाफ़ार खाऊ घेतला. आणि थेट रानाकडे.. मग रानात गेल्यावर करवंदी, बोर असे रानातील फ़ळे खाऊन खुप फ़िरले. नंतर नदीजवळ आल्यावर कल्पेशने मित्रांना सांगितले कि, चला आपण अंघोळ करु. मग मित्रांनी आप-आपली कपडे काढून अंघोळीला पाण्यात उड्या टाकल्या. मग तासभर अंघोळ झाल्यावर घरी जायला निघाले. तेवढयात मागचा मित्र पाण्यातच होता, तो म्हणाला की, "तुम्ही जा, मी थोड्या वेळाने येतो". हे एेकुण बाकीचे मित्र घरी निघाले. मग एक मित्र खुपवेळ पाण्यात खेळुन बाहेर येताना त्याचा पाय कोणीतरी आत खेचत असल्याचे भासले. आणि तो आत खेचत गेला. त्याने ओरडण्याचा खुप प्रयत्न केला, पण सगळे फ़ुकट गेले. शेवटी त्याचा म्रुत्यु झाल्याचे कळले.

No comments:

Post a Comment

Nice Blog