Translate

Wednesday, November 21, 2018

जंगलातील फ़ळे

                                         जंगलातील फ़ळे     
         आज शनिवार म्हणुन उद्या रविवार.. उद्या काय कारायचे ? याचाच विचार चाल्ला होता. तेवढ्यात संदेश बोल्ला की उद्या मस्त मोरणं खायला जोगमोरीवर जाऊ. तेव्हा रवि आणि संदेश हे दोघे जवळ तर जितेश आणि मी गावात असुन लांब राहत होतो.

         मग रविवारचा दिवस.. आज मी सकाळी ९ वाजता जितेशच्या घरी जायला निघलो. घरी गेल्यावर जितेश लगेच रविच्या घरी जायला निघला. मग आम्ही दोघे रविच्या घरी पोहचल्यावर रविने कौत्या घेतला आणि रस्त्यावर संदेश वाट बघत आहे, असे रविने सांगितल्यावर आम्ही तिघे रस्त्यावर निघलो. रस्त्यावर संदेश दिसला. मग त्याने एक मधमाशाच्या पोळ्याच्या झाडाकडे नेले. झाडावर रवि कौत्या घेऊन चढला. सोबत त्याने मोठा कपडा आणला होता, तो त्याने तोडावर बांधला होता. मग खाली संदेशने धुर केला. त्यामुळे मधमाशा पोळ्यापासुन दुर जात होत्या. तेवढ्यात रविने पोळा कापायला सुरुवात केली आणि खाली जितेश आणि मी मध टिपत होतो.

     मध टिपुन झाल्यावर रस्त्याच्या पलिकडे आत जाऊन आम्ही मध खायला सुरुवात केली. मध खाऊन झाल्यावर आम्ही पुढे निघालो.. पुढे तोरन्याचे झाड दिसले. झाडावर संदेश चढला.. मग संदेशने झाडावरचे तोरने काढली आणि मग सगळ्यांना खायला दिली. त्यानंतर आम्ही जांबळीच्या झाडाकडे गेलो, खुप सारी जांबळी खाऊन आम्ही जंगलातुन संध्याकाळी घरी आलो.

Tuesday, November 20, 2018

शर्टावर उल्टी

       शर्टावर उल्टी
        काल रविवार होता. त्यामुळे कालच्या सुट्टीनंतर आज सोमवार असल्याने आज १०:३० वा. शाळा होती. त्यामुळे मी १०:१५ मी. शाळेत गेलो. शाळेत गेल्यावर शाळेची प्रतिन्या झाल्यानंतर वर्गात गेलो. १ ला तास मराठीचा. तेव्हा वर्गशिक्षक पाटिल मॅडम होत्या. मॅडमनी हजेरी घेतल्यानंतर मॅडमने शिकवायला सुरुवात केली. मॅडमचा तास संपल्यावर गणिताचा तास होता. गणिताच्या तासाला गंभीरराव मॅडम असल्याने त्या अभ्यासाला कडक  होत्या. शनिवारी मॅडमने गणितं दिली होती, ती गणितं आज मॅडम तपासणार होत्या. तेव्हा गणितात मी कच्चा होतो. माझ्याबरोबरच माझे मित्र संदेश,रविंन्द्र,मनिश,मोनिश,राकेश,जितेश हेही माझ्यासोबत मार खायला आले. कारण आमचा वर्ग शेवटी क होता. म्हणुन मस्तीही भरपुर असायची. मॅडमचा तास संपल्यावर हिंदीचा तास होता. तेव्हा तासाला सर होते. सरांनी शिकवायला सुरुवात केली तेव्हा सगळ्यांना झोपा आल्या. कारण सरांच्या तासाला सगळ्याना कंटाळा यायचा. तेव्हा शेवटुन दुसरा बॅचवर संदश आणि देविदास बसले होते. तेव्हा देविदासला गरम व्हायला लागले. संदेशचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. अचानक देविदास संदेशला बोलणार.. तेवढयात देविदासला जोरात उलटी आली. आणि ती थेट संदेशच्या शर्टावर.. सदेशचे पुर्ण शर्ट माखल्यामुळे सरांनी त्याला शर्ट धुवायला नदीवर पाठवले. तेव्हा संदेशने देविदासला विचारले की, "तु पहिले सांगता येत नव्हता का ?" तेव्हा तो म्हणाला, " तु सांगणार होतो. तेवढ्यातच आली." मग देविदास ल्याला बघुन हसायला लागला. तेव्हा संदेश त्याला म्हणाला, " शाळा सुटल्यावर भेट.. मी तुला चांगलाच भेटतो.." शाळा सुटल्यावर संदेश देविदासला शोधायला लागला. पण तो त्याला दिसलाच नाही ! कारण शाळा सुटतास तो शाळेच्या मागुन धावत घरी गेला होता..

Monday, November 19, 2018

कर्कटकने खुण

                                               कर्कटकने खुण
   एका गावात रितेश नावाचा मुलगा होता. तो ६ वी मध्ये शिकत असल्याने त्याचे शाळेत खुप मित्र होते. तो शाळेत खुप मस्ती करत असल्याने शिक्षक त्याला कंटाळुन गेले होते. एकदा सकाळी ७ वा. शाळा होती. कारण त्यादिवशी शनिवार असल्याने सकाळची शाळा होती. त्यामुळे तो लवकर शाळेत गेला. पण शाळेत ७ वा. १५मी. पोहचल्यावर त्याला शिक्षा झाली. मग सरांनी त्याला दोन छड्या हातावर मारुन वर्गात घेतले. २ तास शिकवुन झाल्यावर पुढचा तास मराठीचा होता. तेव्हा मॅडमचा तास असल्याने मॅडमला वर्गात यायला उशिर होणार होता. तेव्हा त्यावेळी वर्गात अशीच तिन-चार रितेशला पकडुन मस्ती चाल्ली होती. तेव्हा ही मस्ती रविश,दत्ता,मनिश यामध्ये होती. मनिश हा कोपरात तर रविश मध्ये तर रितेश हा त्याच्या बाजुला आणि दत्ता त्याच्या पुढे बसला होता. मग रितेशने रविन्द्रला डालडा चिडवायला सुरुवात केली. कारण रविशच्या नाकातुन सतत शेंबुड असल्याने त्याला डालडा म्हणुन रितेश चिडवायला लागला. तेव्हा त्याच्या पाठोपाठ नितेश,मनिश हे दोघेही सुरु झाले. मग रविशला भयंकर राग आल्याने त्याच्या समोर कंपास पेटी होती. 
      त्या कंपास पेटीमधुन त्याने कर्कटक काढले आणि रितेशच्या पोटात मारले. तेव्हा त्याच्या शर्टातुन रक्त आल्याचे दिसल्याने दत्ता,मनिश हे घाबरले, आणि तेवढयात त्याला आॅफ़िसकडे जायला सांगितले. तेव्हा तो जात होताच तर रस्त्यात मॅडम दिसल्या, मॅडमने विचारले की, काय झाले ? तेव्हा मनिशने सांगितले की याला रविशने कर्कटक मारले आहे. मग मॅडम त्याला आॅफ़िसमध्ये घेऊन गेल्या आणि तिथे सर होते. त्या सरांना मनिशने संपुर्ण प्रकार सांगितला. तेव्हा सरांनी रविशला आॅफ़िसमध्ये बोलावले. मग सरांनी त्याला मारायला सुरुवात केली. आणि मनिशला रविशच्या आईला बोलावुन आणायला सांगितले. तेव्हा काही वेळाने रविशची आई तिथे आली. आणि तिला हा प्रकार सांगितला. तेव्हा तिनेही रविच्या कानाखाली दोन मारल्या. नंतर सरांनी रितेशला घरी पाठवले. 

Sunday, November 18, 2018

प्रकल्पाच्या नावाने पैसे

                                          प्रकल्पाच्या नावाने पैसे
    दिनेश नावाचा मुलगा होता. तो ८ वीत असल्याने शाळेचा गणवेश बदलला. सफ़ेद शर्ट आणि खाकी पॅट असा शाळेचा गणवेश. शाळेत ग्रहपाठाच्या नावाने अभ्यास भरपुर असायचा. शाळेत वर्गपाठाची वही, ग्रहपाठाची वही, अशा दोन वह्या तर वाढल्या. पण तसेच विषय ९. गणित, मराठी, हिंदी,समाजशास्ञ असे विषय असताना वर्गपाठाची वही, ग्रहपाठाची वही व्हायच्या. मग वह्या पुर्ण नसल्या तर शाळेत मार मिळायचा. म्हणुन वह्या नेहमी पुर्ण कराव्या लागत होत्या. एकदा ग्रहपाठाच्या वह्या पुर्ण नसल्याने शिक्षकाने त्याला शिक्षा केली. त्यामुळे तो नेहमी वह्या पुर्ण ठेवु लागला.
 एकदा प्रकल्प करण्याचे सरांनी ठरवल्यावर सगळ्यांना ग्रुप मिळुन विषय देण्यात आले होते. मग दिनेश हा ग्रुप प्रमुख असल्याने प्रकल्पाचा संपुर्ण खर्च त्याच्या ग्रुपमधील मुलांकडुन घ्यायचा होता म्हणुन ५ मुलांचा ग्रुप असल्याने पुढील तपशील प्रमाणे पैसे काढले: 



 

मग प्रत्येकाकडुन १० रु प्रमाणे ५ मुलांचे ५० रु. आणि उरलेले पैसे १९ रु. 

अशा प्रकारे त्याने पैसे गोळा करुण मुलांना न कळता प्रकल्पाचे पैसे खाल्ले. 

Saturday, November 17, 2018

शाळेच्या कामात फ़ुकट पैसा

                                                  शाळेच्या कामात फ़ुकट पैसा
      शाळेत गेल्यावर असे वाटते की, कधी शाळा सुटते आणि कधी घरी जातो. असा प्रशन्न प्रत्येक मुलांना येतो. शेड गावात राहणारा राम याला शाळेत जायचा सारखा कंटाळा यायचा. त्याचे शाळेत खुप मित्र होते. शाळेत बसायला शेवटुन दुसरा बॅचवर बसायचा. मग शाळेत मस्तीत पुढे तर अभ्यासात कमी. एकदा सरांनी त्याला वाचायला सांगितले, तेव्हा इंग्रजीचा तास होता. वाचायला आले नाही सरांनी त्याला बॅचवर उभे राहण्याची शिक्षा केली. मग दुपारनंतर वर्गात नोटीस आली. अंधळ्या लोकांना मद्द म्हणुन पैसे गोळा करुन द्याचे. मग सर्वाना एक पैसे गोळा करण्यासाठी एक कागद दिला. त्यात शाळेतर्फ़े पैसे गोळा करायचे होते. मग दुसरा दिवशी शाळा सुटल्यावर प्रत्येकाच्या घरी जाऊन पैसे मागायला गेला. तेव्हा घरातुन १० रु मागायचे. १ रु नोंद कागदात करायची. असे १ रु मिळुन ५० रु केले. आणि शाळेत सरांनी सांगितले की कमीत-कमी ५० रु करायचे. मग त्याचे झाले होते. दुसरा दिवशी शाळेत गेला, तेव्हा त्याच्या मित्रांनी कागद आणि पैसे जमा केले. मग रामने आपले पैसे जमा करताना दुसरा मित्राने पाहिले, मग तो मित्र जागेवर जाऊन त्याला बोल्ला की तु प्रत्येक घरातुन १० रु काढले. तर बाकीचे कुठे गेले. हे त्याने विचारले, तेव्हा तो म्हणाला की, १ रु प्रमाणे ५० रु. शाळेत. आणि १० रु प्रमाणे आपल्या खिशात. शेवटी आपण घरो-घरी जाऊन पैसे मागितले. मग शेवटी आपल्याला काही मिळाले पाहिजे ना ! असे एेकताच मित्र म्हणाला की, बरोबर बोल्ला तु, शेवटी शाळेचा पैसा फ़ुकट असतानाही मेहनतीचे पैसे होते...

Friday, November 16, 2018

शाळेत एकदा चित्रपट

                                                शाळेत एकदा चित्रपट  
    लहानपणी शाळेत जायला कंटाळा यायचा. मग शाळेत आज काही नविन आहे की नाही, याची उत्सुक्ता सतत लागत होती. एकदा पावसाळ्यात शाळेत जायला त्रास वाटत होता. कारण रस्त्यावर सगळीकडे चिकल साचल्याने रस्त्याने जायला खुप त्रास होत होता. तरीही कसेबसे चिकलातुन जायचे आणि शाळेत वेळेवर पोहचायचे. मग त्यादिवशी पाऊसही खुप होता. दुपारनंतर पाऊस थांबला. मग २ वाजता एक माणुस आला. त्याने प्रथम मुख्याध्यापकाची भेट घेतली. नंतर त्याने आमच्या वर्गात एक सफ़ेद कपडा फ़ळ्यावर लावला. मग एक मोठी मशीन होती, त्या मशीनीवर एक मोठी सपाट प्लेटसारखी कॅसेट त्याने त्या मशीनीमध्ये टाकली आणि मग पडद्यावर एक चित्रपट लागला. चित्रपट हा एक गावातील लोकांवर अवलंबून असल्याने सर्वाना तो चित्रपट खुप आवडला. मग चित्रपट संपल्यावर त्या माणसाने आपले सामान आवरुन त्या मुख्याध्यापकाकडुन आदण्या घेतली. मग सर्व मुलांनी त्या माणसाला आनंदाने पैसे दिले. कुणी १ रु तर कुणी २ रु. दिले. मग पैसे घेऊन तो माणूस शाळेतुन निघुन गेला.

Thursday, November 15, 2018

५ वी ला हिंदी विषयाचा कंटाळा

                                      ५ वी ला हिंदी विषयाचा कंटाळा

   ५ वी ला अभ्यासाचे विषय वाढले. त्यात नविन विषय हिंदी. हिंदी विषय एेकायला न समजायसारखा होता. तेव्हा सर जेव्हा हिंदी विषय शिकवत होते तेव्हा खुप कंटाळा येत होता.

असे खुप वेळा झाले. मग एकदा आम्ही गंमत म्हणुन एकदा सरांनी हिंदी शिकवायला सुरुवात केली. तेव्हा अचानक एक मुलगा सरांकडे निरिक्षण करुन पाहु लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की सर धडा शिकवताना पुस्तक हे डोळ्यासमोर ठेवत होते. मग एका मुलाला तास घालवण्याची युक्ती सुचली. "त्याने पुस्तक बॅन्चवर ठेवले आणि पुस्तकावर डोके ठेवुन तो झोपुन गेला.

 मग सगळ्या मुलांनी तेच केले. तेव्हापासुन सरवांनी तेच केले. मग सरांचा विषय असला की सगळी मुले हेच करु लागली. मग परिक्षा आली. काय करायचं ? असा विवार सगळ्यांना आला. मग आम्ही सगळी मुलं मिळुन एक युक्ती काढली, आम्ही सरांचा विषय हा एक गोष्टीचे पुस्तक म्हणुन एेकु लागलो. तेव्हा आम्हाला परिक्षामध्ये चांगले गुण मिळाले. तेव्हापासुन हिंदी हा विषय सगळ्याचा आवडता झाला.