Translate

Thursday, November 15, 2018

५ वी ला हिंदी विषयाचा कंटाळा

                                      ५ वी ला हिंदी विषयाचा कंटाळा

   ५ वी ला अभ्यासाचे विषय वाढले. त्यात नविन विषय हिंदी. हिंदी विषय एेकायला न समजायसारखा होता. तेव्हा सर जेव्हा हिंदी विषय शिकवत होते तेव्हा खुप कंटाळा येत होता.

असे खुप वेळा झाले. मग एकदा आम्ही गंमत म्हणुन एकदा सरांनी हिंदी शिकवायला सुरुवात केली. तेव्हा अचानक एक मुलगा सरांकडे निरिक्षण करुन पाहु लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की सर धडा शिकवताना पुस्तक हे डोळ्यासमोर ठेवत होते. मग एका मुलाला तास घालवण्याची युक्ती सुचली. "त्याने पुस्तक बॅन्चवर ठेवले आणि पुस्तकावर डोके ठेवुन तो झोपुन गेला.

 मग सगळ्या मुलांनी तेच केले. तेव्हापासुन सरवांनी तेच केले. मग सरांचा विषय असला की सगळी मुले हेच करु लागली. मग परिक्षा आली. काय करायचं ? असा विवार सगळ्यांना आला. मग आम्ही सगळी मुलं मिळुन एक युक्ती काढली, आम्ही सरांचा विषय हा एक गोष्टीचे पुस्तक म्हणुन एेकु लागलो. तेव्हा आम्हाला परिक्षामध्ये चांगले गुण मिळाले. तेव्हापासुन हिंदी हा विषय सगळ्याचा आवडता झाला.

No comments:

Post a Comment

Nice Blog