Translate

Saturday, November 17, 2018

शाळेच्या कामात फ़ुकट पैसा

                                                  शाळेच्या कामात फ़ुकट पैसा
      शाळेत गेल्यावर असे वाटते की, कधी शाळा सुटते आणि कधी घरी जातो. असा प्रशन्न प्रत्येक मुलांना येतो. शेड गावात राहणारा राम याला शाळेत जायचा सारखा कंटाळा यायचा. त्याचे शाळेत खुप मित्र होते. शाळेत बसायला शेवटुन दुसरा बॅचवर बसायचा. मग शाळेत मस्तीत पुढे तर अभ्यासात कमी. एकदा सरांनी त्याला वाचायला सांगितले, तेव्हा इंग्रजीचा तास होता. वाचायला आले नाही सरांनी त्याला बॅचवर उभे राहण्याची शिक्षा केली. मग दुपारनंतर वर्गात नोटीस आली. अंधळ्या लोकांना मद्द म्हणुन पैसे गोळा करुन द्याचे. मग सर्वाना एक पैसे गोळा करण्यासाठी एक कागद दिला. त्यात शाळेतर्फ़े पैसे गोळा करायचे होते. मग दुसरा दिवशी शाळा सुटल्यावर प्रत्येकाच्या घरी जाऊन पैसे मागायला गेला. तेव्हा घरातुन १० रु मागायचे. १ रु नोंद कागदात करायची. असे १ रु मिळुन ५० रु केले. आणि शाळेत सरांनी सांगितले की कमीत-कमी ५० रु करायचे. मग त्याचे झाले होते. दुसरा दिवशी शाळेत गेला, तेव्हा त्याच्या मित्रांनी कागद आणि पैसे जमा केले. मग रामने आपले पैसे जमा करताना दुसरा मित्राने पाहिले, मग तो मित्र जागेवर जाऊन त्याला बोल्ला की तु प्रत्येक घरातुन १० रु काढले. तर बाकीचे कुठे गेले. हे त्याने विचारले, तेव्हा तो म्हणाला की, १ रु प्रमाणे ५० रु. शाळेत. आणि १० रु प्रमाणे आपल्या खिशात. शेवटी आपण घरो-घरी जाऊन पैसे मागितले. मग शेवटी आपल्याला काही मिळाले पाहिजे ना ! असे एेकताच मित्र म्हणाला की, बरोबर बोल्ला तु, शेवटी शाळेचा पैसा फ़ुकट असतानाही मेहनतीचे पैसे होते...

Friday, November 16, 2018

शाळेत एकदा चित्रपट

                                                शाळेत एकदा चित्रपट  
    लहानपणी शाळेत जायला कंटाळा यायचा. मग शाळेत आज काही नविन आहे की नाही, याची उत्सुक्ता सतत लागत होती. एकदा पावसाळ्यात शाळेत जायला त्रास वाटत होता. कारण रस्त्यावर सगळीकडे चिकल साचल्याने रस्त्याने जायला खुप त्रास होत होता. तरीही कसेबसे चिकलातुन जायचे आणि शाळेत वेळेवर पोहचायचे. मग त्यादिवशी पाऊसही खुप होता. दुपारनंतर पाऊस थांबला. मग २ वाजता एक माणुस आला. त्याने प्रथम मुख्याध्यापकाची भेट घेतली. नंतर त्याने आमच्या वर्गात एक सफ़ेद कपडा फ़ळ्यावर लावला. मग एक मोठी मशीन होती, त्या मशीनीवर एक मोठी सपाट प्लेटसारखी कॅसेट त्याने त्या मशीनीमध्ये टाकली आणि मग पडद्यावर एक चित्रपट लागला. चित्रपट हा एक गावातील लोकांवर अवलंबून असल्याने सर्वाना तो चित्रपट खुप आवडला. मग चित्रपट संपल्यावर त्या माणसाने आपले सामान आवरुन त्या मुख्याध्यापकाकडुन आदण्या घेतली. मग सर्व मुलांनी त्या माणसाला आनंदाने पैसे दिले. कुणी १ रु तर कुणी २ रु. दिले. मग पैसे घेऊन तो माणूस शाळेतुन निघुन गेला.

Thursday, November 15, 2018

५ वी ला हिंदी विषयाचा कंटाळा

                                      ५ वी ला हिंदी विषयाचा कंटाळा

   ५ वी ला अभ्यासाचे विषय वाढले. त्यात नविन विषय हिंदी. हिंदी विषय एेकायला न समजायसारखा होता. तेव्हा सर जेव्हा हिंदी विषय शिकवत होते तेव्हा खुप कंटाळा येत होता.

असे खुप वेळा झाले. मग एकदा आम्ही गंमत म्हणुन एकदा सरांनी हिंदी शिकवायला सुरुवात केली. तेव्हा अचानक एक मुलगा सरांकडे निरिक्षण करुन पाहु लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की सर धडा शिकवताना पुस्तक हे डोळ्यासमोर ठेवत होते. मग एका मुलाला तास घालवण्याची युक्ती सुचली. "त्याने पुस्तक बॅन्चवर ठेवले आणि पुस्तकावर डोके ठेवुन तो झोपुन गेला.

 मग सगळ्या मुलांनी तेच केले. तेव्हापासुन सरवांनी तेच केले. मग सरांचा विषय असला की सगळी मुले हेच करु लागली. मग परिक्षा आली. काय करायचं ? असा विवार सगळ्यांना आला. मग आम्ही सगळी मुलं मिळुन एक युक्ती काढली, आम्ही सरांचा विषय हा एक गोष्टीचे पुस्तक म्हणुन एेकु लागलो. तेव्हा आम्हाला परिक्षामध्ये चांगले गुण मिळाले. तेव्हापासुन हिंदी हा विषय सगळ्याचा आवडता झाला.

Wednesday, November 14, 2018

शाळेत छञप्ती शिवाजी महाराजांचा चिञपट

                                 शाळेत छञप्ती शिवाजी महाराजांचा चिञपट

      शाळा ही सर्वाना प्रिय असते असे नाही. शाळेत मुलांना शिकवलेले कहीच समजत नाही. अशी तक्रार सर्व शिक्षकांची होती. मग शिक्षकांना एक युक्ती सुचली. शिक्षकांनी सर्व वर्गात टि.व्ही लावला. आणि त्यात छञप्ती शिवाजी महाराजांचा चिञपट लावला. चिञपटमध्ये महाराजांचे संपुण सुरुवातीपासुनचा प्रवास दाखवला होता. मग मध्येच वर्गात लाइटही सारखी जायची. आणि लाइट आल्यावर सर्व मुलांचा गोंगाट व्हायचा. मग शेवटी चित्रपट पुर्ण बघून झाल्यावर शिक्षकांनी मुलांना काही प्रशन्न विचारले, मग त्या प्रशनाचे उत्तर मुलांनी अचुक दिल्याने सर्व शिक्षकांनी एकांत होऊन म्हटले की, आपल्या युक्तीचे चिज झाले.

Tuesday, November 13, 2018

शाळेत मस्ती

                                शाळेत मस्ती
   शाळेत गेल्यावर रोजप्रमाणे नविन पाहायला मिळते. आज रोजसारखे शाळेत गेल्यावर सकाळी सरांनी थोडेफ़ार शिकवले. नंतर दुपारी जेवनाची सुट्टि झाली. सुट्टित जेवणाचा डब्बा खाल्ला आणि मग मित्रानी मस्ती करायला सुरुवात केली. मस्ती डब्बा धुताना झाली. तिही चंदन आणि शाम मध्ये, चंदनने मुद्दावुन डब्बा धुताना शामच्या अंगावर पाणी टाकले त्यामुळे शामला राग आला आणि शामने त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण तो त्याच्या तावडीत सापडलाच नाही. नंतर चंदन त्याला बाहेर चालताना दिसला, मग त्याठिकाणी रस्त्यावर एक ब्लेड पडले होते. ते ब्लेड त्याने उचलले आणि आपला बदला बदला घेण्याच्या उद्देशाने त्याने त्याच्या खांद्यावर ब्लेड मारले. तेवढयात रक्ताच्या धारा वाहु लागल्या आणि चंदन जोरात रडु लागला. तेवढयात सर आले मग सरांनी त्याच्या जखमेवर मलम पट्टी केली आणि त्याला घरी पाठवले. शामला सरांनी खुप धुतला. दुसरा दिवशी शाळेत पालकांना आणायचे असे त्याला सांगितले. त्यामुळे हि मस्ती शामला खुप महाग पडली.

Monday, November 12, 2018

२ री ला दुसरा वेळी पास

                               २ री ला दुसरा वेळी पास
     २री ला शाळेत अभ्यासाचे नविन विषय आले. तरीही त्यात नविन होते ते विषय. गणित विषय हा कठिण असल्यासारखा झाला. शाळेत गणित शिकवायला शिक्षिका होत्या, पण त्याचा काहिच फ़ायदा झाला नाही. शेवटी घरातल्यानी शिकवणी लावली, पण तेही वाया गेले. शेवटी वाषिॅक परिक्षा आली. परिक्षामध्ये गणित विषय खुप कठिण गेला. मग रिझल्ट आल्यावर गणित विषय गेल्याचे कळले. गणितात २ गुण घरातल्याना कळल्यावर घरातल्याना शिक्षकांनी बोलावले, शिक्षकांनी सागितले की, याला काहीच समजत नाही म्हणुन त्याला नापास करावे लागले. असे दोन वर्षी सलग झाले. मग तिसरा वर्षी नविन शिक्षक आले. मग शिकवलेले थोडेफ़ार समजायला लागले. नंतर वार्षिक परिक्षेत दुसरा क्रमांक आल्याने घरातली खुप खुश झाली.

Sunday, November 11, 2018

१ ली चा वर्ग

                                            १ ली चा वर्ग
   शाळेचा पहिला दिवस. शाळेत नवीन मुलं-मुली व शिक्षक. पहिला दिवस म्हणुन शिक्षकांनी मुलांची ओळख करुन घेतली. मग पहिल्या दिवशी फ़ारसे शिकवले नाही. मग ५ वाजले आणि शाळा सुटली. मग घरी गेल्यावर विचार केला की, उद्या सर काय शिकवणार ? त्याचा अभ्यास केला. मग मित्रांसोबत खेळुन घरी आलो. मग उद्या १२ वाजता शाळेत जायचे म्हणुन सकाळी लवकर उठण्याची गरज नाही. म्हणून सकाळी ९ वाजता उठलो. अंघोळ केली. मग खेळायला गेलो. ११:३० वाजता शाळेत गेल्यावर सरांनी शिकवायला सुरुवात केली. मग पहिला दिवस चांगला गेला. मग अशेच २ महिने गेले. मग मला लिहायला आले. मी एकदा मॅडला वहिवर लिहुन दाखवले, तेव्हा मॅडने मला शाबासकी दिली. त्यानंतर आमची वार्षिक परिक्षा आली. परिक्षामध्ये काहीच समजत नव्हते. त्यामुळे मी नापास झालो.