Translate

Sunday, October 28, 2018

शाळा

                                                    शाळा
     रोळ नावाचे एक गाव होते. त्या गावाची लोकसंख्या २० घरे अशी होती. त्या गावात एक शाळा होती. त्या शाळेत २० मुले शिकत होती. त्या शाळेत एकदा घटना घडली, एकदा शाळेत एक विषारी साप आला. तो सर्वात पहिले २ विद्यार्थांना चावला. तेव्हा शिक्षकांनी हे सर्व पाहिले. मग शिक्षकांनी सापाला मारण्याचा प्रयत्न केला. पण ते अयशस्वी ठरले. शेवटी एका विद्यार्थाने साहस करुन सापावर टेबलाने हल्ला केला तर, तो मुळात जखमी झाला. शेवटी एक मोठा दगड डोक्यात घातला आणि साप मेला.

Saturday, October 27, 2018

शेती

                                                     शेती
       एका गावात राम नावाचा मुलगा राह्त होता. तो शेती करत असे. त्याला शेती करायला फ़ार आवडत असे.

                                                                                   एकदा त्याला शेतात एक साप दिसला, तो एक नाग होता.
 
 आणि त्याच्या कपाळावर काही चमकत होते. म्हणुन राम जवळ गेला तर्, त्याला एक कपाळावर मणी दिसला.
 
 मग तो मणी घेण्यासाठी त्याने सापाला मारण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. तेव्हा त्याने सापाचा मणी घेतला. आणि सरळ त्याने बाजाराकडे धाव घेतली. बाजारात दुकानात मणी पाह़्ताच दुकानदार समजला की, मणी अनमोल आहे.
 
 मग त्या दुकानदाराने त्याला पैसे दिले. आणि हे सर्व करताना एका माणसाने पाहिले. मग त्या मानसाने त्याचा पाठलाग केला आणि शेवटी रामला वाटले कि कोणतरी आपला पाठलाग करतो. म्हणुन बघितले तर तेवढयात रामवर जोराचा हल्ला झाला. त्या हल्लात राम मेला. मग रामचे शरिर त्याच्या शेतात टाकले. जिथे रामने एक साप मारला होता, तोही त्याच्या शेतात. त्यामुळे त्याच्या मरणाला तोच कारण झाला.

Friday, October 26, 2018

नोकरीत फ़सवणुक

     एक राजु नावाचा मुलगा होता. १५वी झाल्यानंतर राजु नोकरीचा शोधात होता. त्यामुळे त्याने इंटरनेटवर त्याचा बायोडाटा पाठवला. मग त्याला एका कंपनीवरुन फ़ोन आला, तेव्हा तो दुसरा दिवशी त्या जागेवर गेला, मग तेथे त्याला एक मॅडम भेटल्या, त्या मॅडमने त्याची मुलाखत घेतली. मुलाखत घेतना त्याच्याकडुन ८०० रुपये घेतले. आणि त्याने ते काढूंण दिल्यावर त्याला पुढच्या दिवशी यायला सांगितले. दुसरा दिवशी तो त्या दिवशी गेला तेव्हा तेथे काहीच नव्हते. मग तो नाराज होऊन घरी गेला.

Thursday, October 25, 2018

बॅट

    एक चाळ होती. त्या चाळीत १५ माणसांची वस्ती होती. त्या चाळीत काही लहान मुले राहत होती. सण असले की सर्वजण एकत्र मिळुन साजरे करत असे.
      दिवाळी, होळी, गणपती अशे सण त्या चाळीत खुप जोराने साजरे होत असे. चाळीत काही लोक मराठी, हिंदु, जातीतील होते. चाळीत एक शंकर देवाचे देऊळ होते. सर्व चाळीतील लोक त्या मंदिरात आवडीने जात होते.
  
 एकदा पावसाळ्यात भरपुर पाऊस आल्याने नदी चाळीच्या जवळ असल्याने नदीला पुर आला त्यामुळे मोठया प्रमाणात चाळीतील घरांमध्ये पाणी शिरले होते. मग चाळीतील लोकांनी कसेबसे करुन दुसरा गावी जाऊन जिव वाचण्याचा प्रयत्न केला. मग संध्याकाळपर्यत पाणी गेल्यावर लोकं परत आपल्या घरी आली.
     
एकदा मुलांनी क्रिकेटचा खेळ सुरु केला. सर्व मुले आवडीने खेळू लागली. अचानक एका मुलाने आपली बॅट चेंडुला मारायला जाणार तेवढयात त्या मुलाच्या हातातुन बॅट सटकुन एका लहान मुलाच्या डोक्याला लागली. त्यातच त्याचा म्रृत्यु झाला. त्यामुळे त्या चाळित त्या दिवसापासुन कधीच बॅट काढली नाही.


                                                     *** समाप्त ***

Wednesday, October 24, 2018

मटण

     एका गावात राहुल नावाचा मुलगा राहत होता. तो गावात मटन खाण्यासाठी म्हणून नावाजला गेला होता. एकदा शेजारांच्या घरी मटनाची मेजवणी होती.

 त्यावेळी गावातील लोकांनी पोटभरुन मटण खाल्ले. तेव्हा काही मटण उरले होते. त्यामुळे शेजारीने मटण संपवण्यासाठी एक बक्षिस ठेवले. सर्व गावकरांनी मटण संपवण्याचा प्रयत्न केला पण कुणालाच संपले नाही. शेवटी राहुल तेथे आला आणि त्याने खाण्यासाठी सुरुवात केली, आणि काही क्षणातच मटण संपले. तेव्हा सर्व लोक आशच्यॆचकित झाले.
    
   यावेळी त्याला त्याचे बक्षिस मिळाले. मग तेव्हा गावातील एक गावकरी हा राहुलवर जळत असल्याने त्याने विचार केला की, आपणही एक स्पर्धा ठेवू आणि राहुलला चांगलीच अद्दल घडवु. तेव्हा स्पर्धाचा दिवस आला, सर्व गावकरांनी भाग घेतला. तेव्हा नेहमी प्रमाणे राहुल तेथे आला. पण अचानक राहुलला कळले की मटण डुकराचे आहे. तेव्हा त्याने स्पर्धेत येण्यास माघारी घेतली. सर्व गावकरी आश्च्र्यचकित झाले. मग राहुलला एका गावकराने माघारी घेण्याचे कारण विचारले तर, त्याने सांगितले कि हे मटण डुकराचे आहे.

   हे एेकताच सर्व गावकरी त्या मानसाकडे धावले. कारण बहुतेक लोक डुकराचे मटण खात नव्हते आणि त्याला मारहाण केली. त्या मारहाणीत त्याचा जिव गेला.


                                              *** समाप्त ***

Tuesday, October 23, 2018

हिरवी विहिर

     एका गावात एक खुप मोठी विहीर होती.

     त्या विहीरीत पाणी स्वच्छ असल्याने गावातील सर्व लोक तेथे पाणी भरुन नेत होते. पावसाळा संपला की, उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्यासाठी खुप मागणी होती.

   लोक लांबच्या गावातुन विहिरीचे पाणी न्यायला जात होती. एकदा पावसाळ्यात विहिरीचे काम गावकरींनी करायला घेतले, तेव्हा एक गावकरीचा अचानक तोल गेला. आणि तो विहिरीत पडला. विहिर खोल असल्याने त्याला वाचवता आले नाही. त्यामुळे त्याचा म्रुत्यु झाला.
   दुसरा दिवशी एक गावकरी सकाळी पाणी भरण्यासाठी गेला, तेव्हा अचानक विहिरीच्या पाण्याने त्याला आत घेचले आणि तो पाण्यात आत जाऊन त्याचा म्रुत्यु झाला. त्या दिवसापासुन त्या विहीरीजवळ कोणीही जाण्याचा प्रयत्न केला नाही. पण कोणाचीही हिंमत झाली नाही. त्यामुळे त्या विहिरीला हिरवी विहिर असे म्हटले जाऊ लागले. कारण त्या विहिरीच्या पाण्याचा रंग हिरवा होता.


                                                   *** समाप्त ***

Monday, October 22, 2018

भेंडीचे झाड

     एका गावात एक खुप मोठे भेंडीचे झाड होते.
    
    त्या झाडावर खुप मुले खेळत असे. ते झाड खुप जुने असल्याने लहान मुलांना खुप आवडत होते. एके दिवशी त्या भेंडीच्या झाडाला फ़ास बांधून एका मुलीने आत्महत्या केली.   त्या आत्मह्त्येचे मुळ कारण त्या मुलीचे वडिल होते.  कारण तिच्या वडिलांना आपली मुलगी बाहेर गेलेली आवडत नसल्याने त्यानी तिच्या शाळेत जायचे कायमचे बंद केले. त्यामुळे त्या मुलीने घराच्या बाहेर निघुन भेंडीच्या झाडाला फ़ास बांधून आत्महत्या केली.
   
       त्यादिवशीपासुन त्या मुलीची आत्मा त्या झाडात राहिली. दुसरा दिवशी मुले झाडावर खेळू लागली. अचानक खेळता-खेळता ती मुले गायब झाली. तेव्हा त्या मुलांच्या आई-वडिलांनी त्यांना खुप शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडलीच नाही. शेवटी पोलिसांनीदेखील हार माणली. तरीही एक पोलिस असा होता की, त्याला मुलांच्या आई-वडिलांचे खुप वाईट वाटत होते.

         
      तेव्हा या गोष्टीचा पडताळा करण्यासाठी तो त्या मुलीच्या वडीलांना भेटला तेव्हा त्याला कळले की मुलगी वडीलांमुळे नाराज होती. मग तो पोलीस त्या मुलीच्या वडीलांना झाडाजवळ घेऊन गेला. झाडाजवळ पोहवताच ती मुलगी त्या वडीलांना दिसली तेव्हा वडीलांनी तिची माफ़ी मागितली आणि झाडाच्या तोडयाच मागे धावत जाऊन मुलीच्या वडीलाने जिव दिला. तेव्हा त्या मुलीचा आत्मा शांत झाला आणि गायब झालेली मुले अचानक झाडाच्या बाजुला असलेली दिसली. मग त्या पोलीसाने त्या मुलांना सुखरुप त्यांच्या आई-वडिलांकडे नेले.

                   
                                               *** समाप्त ***