Translate

Wednesday, October 24, 2018

मटण

     एका गावात राहुल नावाचा मुलगा राहत होता. तो गावात मटन खाण्यासाठी म्हणून नावाजला गेला होता. एकदा शेजारांच्या घरी मटनाची मेजवणी होती.

 त्यावेळी गावातील लोकांनी पोटभरुन मटण खाल्ले. तेव्हा काही मटण उरले होते. त्यामुळे शेजारीने मटण संपवण्यासाठी एक बक्षिस ठेवले. सर्व गावकरांनी मटण संपवण्याचा प्रयत्न केला पण कुणालाच संपले नाही. शेवटी राहुल तेथे आला आणि त्याने खाण्यासाठी सुरुवात केली, आणि काही क्षणातच मटण संपले. तेव्हा सर्व लोक आशच्यॆचकित झाले.
    
   यावेळी त्याला त्याचे बक्षिस मिळाले. मग तेव्हा गावातील एक गावकरी हा राहुलवर जळत असल्याने त्याने विचार केला की, आपणही एक स्पर्धा ठेवू आणि राहुलला चांगलीच अद्दल घडवु. तेव्हा स्पर्धाचा दिवस आला, सर्व गावकरांनी भाग घेतला. तेव्हा नेहमी प्रमाणे राहुल तेथे आला. पण अचानक राहुलला कळले की मटण डुकराचे आहे. तेव्हा त्याने स्पर्धेत येण्यास माघारी घेतली. सर्व गावकरी आश्च्र्यचकित झाले. मग राहुलला एका गावकराने माघारी घेण्याचे कारण विचारले तर, त्याने सांगितले कि हे मटण डुकराचे आहे.

   हे एेकताच सर्व गावकरी त्या मानसाकडे धावले. कारण बहुतेक लोक डुकराचे मटण खात नव्हते आणि त्याला मारहाण केली. त्या मारहाणीत त्याचा जिव गेला.


                                              *** समाप्त ***

Tuesday, October 23, 2018

हिरवी विहिर

     एका गावात एक खुप मोठी विहीर होती.

     त्या विहीरीत पाणी स्वच्छ असल्याने गावातील सर्व लोक तेथे पाणी भरुन नेत होते. पावसाळा संपला की, उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्यासाठी खुप मागणी होती.

   लोक लांबच्या गावातुन विहिरीचे पाणी न्यायला जात होती. एकदा पावसाळ्यात विहिरीचे काम गावकरींनी करायला घेतले, तेव्हा एक गावकरीचा अचानक तोल गेला. आणि तो विहिरीत पडला. विहिर खोल असल्याने त्याला वाचवता आले नाही. त्यामुळे त्याचा म्रुत्यु झाला.
   दुसरा दिवशी एक गावकरी सकाळी पाणी भरण्यासाठी गेला, तेव्हा अचानक विहिरीच्या पाण्याने त्याला आत घेचले आणि तो पाण्यात आत जाऊन त्याचा म्रुत्यु झाला. त्या दिवसापासुन त्या विहीरीजवळ कोणीही जाण्याचा प्रयत्न केला नाही. पण कोणाचीही हिंमत झाली नाही. त्यामुळे त्या विहिरीला हिरवी विहिर असे म्हटले जाऊ लागले. कारण त्या विहिरीच्या पाण्याचा रंग हिरवा होता.


                                                   *** समाप्त ***

Monday, October 22, 2018

भेंडीचे झाड

     एका गावात एक खुप मोठे भेंडीचे झाड होते.
    
    त्या झाडावर खुप मुले खेळत असे. ते झाड खुप जुने असल्याने लहान मुलांना खुप आवडत होते. एके दिवशी त्या भेंडीच्या झाडाला फ़ास बांधून एका मुलीने आत्महत्या केली.   त्या आत्मह्त्येचे मुळ कारण त्या मुलीचे वडिल होते.  कारण तिच्या वडिलांना आपली मुलगी बाहेर गेलेली आवडत नसल्याने त्यानी तिच्या शाळेत जायचे कायमचे बंद केले. त्यामुळे त्या मुलीने घराच्या बाहेर निघुन भेंडीच्या झाडाला फ़ास बांधून आत्महत्या केली.
   
       त्यादिवशीपासुन त्या मुलीची आत्मा त्या झाडात राहिली. दुसरा दिवशी मुले झाडावर खेळू लागली. अचानक खेळता-खेळता ती मुले गायब झाली. तेव्हा त्या मुलांच्या आई-वडिलांनी त्यांना खुप शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडलीच नाही. शेवटी पोलिसांनीदेखील हार माणली. तरीही एक पोलिस असा होता की, त्याला मुलांच्या आई-वडिलांचे खुप वाईट वाटत होते.

         
      तेव्हा या गोष्टीचा पडताळा करण्यासाठी तो त्या मुलीच्या वडीलांना भेटला तेव्हा त्याला कळले की मुलगी वडीलांमुळे नाराज होती. मग तो पोलीस त्या मुलीच्या वडीलांना झाडाजवळ घेऊन गेला. झाडाजवळ पोहवताच ती मुलगी त्या वडीलांना दिसली तेव्हा वडीलांनी तिची माफ़ी मागितली आणि झाडाच्या तोडयाच मागे धावत जाऊन मुलीच्या वडीलाने जिव दिला. तेव्हा त्या मुलीचा आत्मा शांत झाला आणि गायब झालेली मुले अचानक झाडाच्या बाजुला असलेली दिसली. मग त्या पोलीसाने त्या मुलांना सुखरुप त्यांच्या आई-वडिलांकडे नेले.

                   
                                               *** समाप्त ***

Sunday, October 21, 2018

हिरे, रत्नाचा माणूस

      एका गावात एक राजेश नावाने मुलगा राहत होता. तो खुप गरिब असल्याने त्याला पोटभर अन्न मुशकिलने मिळत होते. त्याच्या गावातील त्याचे मित्र त्याला चिडवत होते. कारण तो गरिब होता. मग तो असाच जंगल्यातुन जात होता. अचानक त्याला सारखा-सारखा त्या मुलांचा आवाज येऊ लागला. मग तो त्याला कंटाळून त्याच्या मनात आत्महत्येचा विचार आला. मग त्याने एक मोठी दरी बघितली. त्याने फ़ारसा विचार न करता त्याने उडी टाकली पण तो दरीच्या कोपराला असलेले एक झाड होते.
   
   त्या झाडाच्या फ़ांदीमध्ये अडकला. तेव्हा त्याची नजर दरीच्या कोपरामध्ये पडली. त्या कोपरामध्ये काही चमकलेले दिसले. मग तो त्या कोपरामध्ये जाण्याचा प्रयत्न करु लागला. अचानक त्याने त्या कोपरामध्ये हात गेला आणि त्याच्या हाताने त्या कोपराचा बाजुचा भाग हा बाहेर निघाला. मग तेथे एक गुफ़ा तयार झाली. त्या गुफ़ेमध्ये त्याने जाण्याचा प्रयत्न केला, आणि अचानक तो कसाबसा गुफ़ेत गेला. गुफ़ेत त्याला एक वयस्कर माणूस दिसला.

    त्या वयस्कर माणूसाला बघुन तो थोडा घाबरला मग त्याला त्या वयस्कर माणूसाने हाक दिली. त्या माणसाने त्याला विचारले कि, "तु जिव का द्या जात होतास, " मग करणने सांगितले की, मी गरीब आहे. त्यामुळे मला लोक माझा अपमान करतात​. त्यामुळे मी आत्महत्या करायला चाललो होतो. तेव्हा त्या  वयस्कर माणूसाने त्याला विचारले की तुला काय हवं आहे की तु आनंदीत होशील. मग करण म्हणाला की, मी ज्या वस्तुला स्पर्श करील ती वस्तू हिरे, रत्नामध्ये रुपांतरित होईल. तेव्हा त्या वयस्कर माणूसाने त्याला पाणी दिले आणि सांगितले की, हे पाणी जो पर्यत तुझ्या हातात राहिल, तोपर्यत तु हिरे, रत्नामध्ये रुपांतरित करु शकशील.
   
    मग तो तिथुन निघुन गावातील बाजारात आला, आणि तेथे त्याने हातात पाणी घेतले आणि काही क्षणांतच त्याने मातीचे रुपांतर हिरे, रत्नामध्ये केले. समोरचे लोक बघताच ते चकित झाले. मग हे पाहताना त्याला एका माणसाने बघितले, मग त्या माणसाने त्या पाठलाग केला आणि शेवटी तो त्याच्या घरी गेला. आणि तो नसताना त्याने ते पाणी पिले. मग काही वेळ त्याला वेगळे वाटले. तो घराच्या बाहेर गेला. अचानक राजेश त्याच्या समोर आला आणि त्याने त्या माणसासमोर विचार करताच, तो माणूस एक मोठा दगडात रुपांतर झाला.. 


Saturday, October 20, 2018

लालच चे फ़ळ कधीही वाईट असते

       

एका गावात अजय आणि आकाश नावाने दोन मित्र राहत होते.  सुरज हा चांगल्या घरातला होता. तर आकाश हा गरिब होता. तरीही दोघांमध्ये वय समान होते.  

ते दोघे ५वी च्या वर्गात शिकत होते. उनाळाच्या सुट्टया पडल्यामुळे दिघांना वाटले की काहीतरी वेगळे करायला हवे. मग त्यांनी त्यांच्या आजोबांच्या तोंडून एकदा ऐकले होते की, जंगलात काही जादू सारखे आहे. ते कोणालाच मिळत नाही.
    
  काही वेगळं घेण्याच्या शोधात गेले. तेव्हा एका घनदाट जंगलात गेले. तेथे त्यांना एक दगड मिळाला. दगड सामान्यच वाटत होता. तेव्हा आकाशला खुप तहान लागली होती तेव्हा त्या दगडातून पाणी येताना आकाशने पाहिले पाणी पिताना अचानक दगड कमकुवत आहे. हे अजयच्या लक्षात आल्यावर त्याने आकाशला मागे ओढले.

 मग अजयने तो दगड तोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दगडातुन काहीतरी दिसले. ते पाहण्यासाठी दोघांनी दगड तोडण्याचा प्रयत्न केला. दगडाचा जोरात आवाज झाला आणि दगडातुन एक हिरवा रंगाचा चमकणारा दगड निघाला.
    
  तो दगड घेऊन दोघे घरी गेले. रस्त्यात आकाश अजयला बोल्ला की हा दगड आज माझ्याकडे ठेवतो. उद्या तु ठेव. असे बोलुन दोघे घरी गेले. मग आकाश घरी गेला तेव्हा त्याच्या घरात कळले होते की तो जंगलात गेला होता. मग तो तेव्हा एकटाच मनात विचार लागला की, माझ्याबद्दल सर्व विसरुन जाऊदे. आणि ते खरे होते. तेव्हा आकाश घाबरतो लगेच अजयकडे जाऊन संपुर्ण घटना सांगतो. तेव्हा अजय बोल्ला की तु गरीब आहेस तर तुझ्यासाठी मोठे घर माग. तेव्हा ते दोघे आकाशच्या घरी जाऊन पाहतात. तर घर मोठे झालेले दिसते. मग आकाश अजुन एकदा असे मागतो की, मी धनवान व्हावा. तेव्हा त्याचे कपडे क्षणात बदलतात. मग आकाश म्हणतो की या दगडाची आता मला काहीच गरच नाही तेव्हा तो दगड अजय स्वत: कडे ठेवतो. आणि तो मागतो की माझ्याकडे पैशाची कमतरता कधीच भासू नये. जेथे नजर जाईल तेथे पैसाच मिळेल. तेव्हा त्याच्या सभोवती वस्तू गायब होऊन त्याला सगळीकडे पेैसे दिसतात.
 
 मग थोड्या वेळाने त्याला भुक लागते, तेव्हा तो त्या दगडाकडे बघायला जातो तर दगडही पेैसे झालेले दिसते. त्यामुळे तो तेथे त्रासुन जातो आणि शेवटी आत्महत्या करतो.
   
                                      *** समाप्त ***         

Friday, October 19, 2018

मेहनतीचे फ़ळ कधीही चांगले मिळते


    एका गावात एक तरुण करण नावाने मुलगा राहत होता. त्याचे वय २२. तो काम करुन शिकत होता.

 एकदा त्याने UPSC चा फ़ार्म भरला. त्यावेळेस त्याच्या कामातील काही कामगार त्याच्यावर हसत होते. मग त्यावेळेस त्याने या गोष्टीचा फ़ारसा विचार केला नाही.
  
 परिक्षाचा दिवस होता त्याला कामातील लोकांनी शुभेछा दिल्या. मग परिक्षेचा निकाल चांगला आला नाही. तेव्हा क्षणभर त्याला दु:ख झाले. तेव्हा ही गोष्ट कामातील मॅनेजरला कळली. मग मॅनेजरने त्याला कामाची ऑफ़र दिली. की Diploma Course करुन घे. म्हणजेच तुला मी इथे कायमस्वरुपी कामावर ठेवतो. मग हे ऐकुण तो खुप मेहनत करु लागला.
  
  शिक्षण झाल्यावर त्याला साहेबांनी चांगल्या जागी कायमस्वरुपी कामावर ठेवले. तेव्हा त्याच्यावर हसणारे काही कामगार त्याच्याकडे बघुन स्वत:चे तोंड लपवत होते. शेवटी त्याचा मालक तेथे आला आणि त्या लोकांसमोर त्याचे काैतुक केले.