राजूचे बिल
राजूचे वडील डाॅक्टर होते. दिनू कधीकधी त्यांच्याबरोबर दवाखान्यात जात असे. तेथे पुष्कळसे लोक येत. कोणी तपासुन घेण्यासाठी येत होते. कोणी म्हणे, "डाॅक्टर, माझं पोट दुखतंय, मला तपासा. " तर कोणी म्हणे, "डाॅक्टर, माझं बिल किती झालं अाहे ते सांगा." राजू एका लहानशा खुर्चीवर बसून ते सारे पाहत असे आणि एेकत असे. दवाखान्यातल्या बराचशा गोष्टी त्याला आता कळू लागल्या होत्या ; पण बिल म्हणजे काय ते अजून त्याला कळले नव्हते. राजूने एेके दिवशी वडिलांना विचारले, "बाबा, बिल म्हणजे काय हो ?" डाॅक्टरांनी टेबलावरचा एक कागद घेतला आणि राजूला दाखवला, "हे बघ. याला बिल म्हणतात. वाच." डाॅक्टर म्हणाले. राजू तो कागद वाचू लागला.
राजू ते बिल कितीतरी वेळ वाचत होता. तो एकदम मधेच हसला. त्याला काय वाटले कुणास ठाऊक. काहीतरी विचार त्याच्या डोक्यात अाला. घरी गेल्यावर राजू अापल्या खोलीत गेला अाणि कागदावर त्याने अापल्या अाईच्या
नावाने एक बिल तयार केले.
ते बिल त्याने आईच्या खोलीत नेऊन ठेवले. दुसरा दिवशी राजू सकाळी उठला. त्याच्या उशाशी चार रुपये ठेवलेले होते. राजूने ते उचलले. तेवढ्यात तेथे ठेवलेला एक कागद त्याच्या द्रष्टीस पडला. त्याच्यावर काहीतरी लिहिलेले होते. त्याने कागद उचलला व चटकन वाचला. आईने राजूच्या नावाने बिल केले होते.
राजूच्या डोळयात एकदम पाणी आले. त्याच गला भरुन अाला. त्याच्या हातातला कागद गळून पडला. ते पैसै घेऊन तो तसाच आईकडे धावत गेला. काही न बोलला त्याने आईला पैसे परत केले व तो आईच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला.
आईने राजूला कुरवाळले व त्याचा मुका घेत ती म्हणाली, "तुझ्या बिलाचे पैसे पावले बरं राजू !"
*** समाप्त ***

No comments:
Post a Comment
Nice Blog