Translate

Friday, December 14, 2018

विश्वास (Trust)

                                                     विश्वास (Trust)
    एका गावात मोहन नावाचा मुलगा राहत होता. तो बेरोजगार होता. त्यामुळे त्याने त्याच्या कामाचे कागदपत्र गावातील सरपंच, सदस्य व इतर नामांकित व्यक्तींना दिले. १ महिन्यानंतर त्याने सगळ्यांकडे जाऊन विचरले तर त्यांच्याकडुन एकच वाक्य आले. कि आम्ही कागदपत्रे पुढे पाठवली आहेत. आता जागा खाली झाल्या तर आम्ही तुला सांगु ! त्यामुळे निराश होऊन त्याला ४ महिने घरी बसावे लागले. शेवटी दुसरा दिवशी सदस्याने सांगितले की, एका ठिकाणी जागा खाली आहे. करशील का तिथे काम ? तो लगच हा म्हणुन दुसरा दिवशी कामाच्या ठिकाणी गेला. पण तेथे त्याला कळले की येथे १ लाख रुपये भरावे लागतील. तेव्हाच काम करु शकतो. असे एेकुण त्याने सदस्याला फ़ोन लावला तर सदस्य बोल्ले की, तुम्हाला नोकरी हवी तर पैसे भरावेच लागतील. तेव्हा हे एेकुण त्याने फ़ोन कट केला. आणि सरळ त्याने सदस्याशी भेट घेतली तर तो म्हणाला कि, तुला काम हवं होते. तर ते मी दिले. तेव्हा मोहन बोल्ला कि साहेब मी तुमच्यावर विश्वास ठेवुन काम बघायला सांगितले तर, तुम्ही माझा विश्वास तोडला. त्यांमुळे त्याने नव्याने स्वत: काम बघायला सुरुवात केली.

Thursday, December 13, 2018

नविन मित्र (New Friends)

                                  नविन मित्र
मुंबई शहरातील एका गावात अनिल नावाचा मुलगा राहत होता. तो मुंबई शहरात नोकरी करत होता. कामात त्याला खुप माणसे पाहावयास मिळाली. काही लोकांशी त्याची मैत्री झाली. त्यात काही लोक वाईट होते. तर काही लोक चांगलेसुद्धा होते. कामात एकदा त्याच्या साहेबाने भरपुर काम दिले होते. पण ते काम त्याच्या कामाच्या बाहेर होते. तरीही त्याने प्रयत्न करुन ते काम करुन दिले. पण त्याचा काही फ़ायदाच झाला नाही, कारण साहेबाला पुर्ण काम वेळेत करुन पाहिजे होते. आणि त्याने हे काम १ तास थांबवुन पुर्ण केले होते. तरीही त्याला बोलणे खावावे लागले. शेवटी एक चांगला मित्र होता. त्याने त्याला सांगितले कि, तु दुसरे काम बघ ! हे काम सोडुन दे ! ह्या कामात तु कितीही चांगले काम करण्याचा प्रयत्न केला पण तुझे कौतुक होणार नाही. त्यामुळे तो उदास असायचा. एका दिव़शी त्याने काही कारणाने काम सोडुन दिले. पण त्याचे काही कालांतरात झालेले चांगले मित्र त्याला अजुनही विचारत होते.

Wednesday, December 12, 2018

एक दिवस काम (One Day Work)

                         एक दिवस काम (One Day Work)

     एका गावात एक भिखाजी नावाचा माणुस राहत होता. तो खुप गरीब होता. एकदा तो आणि त्याची बायको व एक मुलगा असे तिघेजण मामाच्या गावाला गणपतीच्या सणानिमित्त निघाले होते. अचानक त्याच्या बसचा दुरदेेैवी अपघात झाला. त्या अप्घातात त्याची बायको आणि मुलगा हे दोघे कायम सोडुन गेले. त्यादिवशी त्याला वेड लागले. त्यामुळे तो असाच इकडे-तिकडे भटकत होता. रस्त्यात त्याचा गाडीला ठोकुण अपघात झाला. त्या अपघातात त्याची स्म्रुति परत आली. एकदा असाच गावातुन जाताना त्याला एका मोठ्या दुकाणदाराचे घर दिसले . त्या घरातुन तो दुकानदार बाहेर येताना दिसतास भिखाजी त्याच्याकडे गेला. त्याला बोल्ला की " साहेब मला खायला द्या", मी तुमचे कोणतेही काम करेन! तेव्हा त्या साहेबाने त्याला दुकानाची देखरेख करायचे काम दिले. दुपारनंतर काही चोर दुकानात शिरले . त्यावेळी दुकानाचा मालक बाहेर गेला होता. भिखाजीने चोरांना रक्तबंबाळ केले . जेव्हा दुकानाचा मालक आला तेव्हा त्याला भिखाजीने संपुर्ण घटना सांगितल्यावर त्या मालकाने त्याला दुकानाचा संपुर्ण कारभार त्याच्याकडे दिला. तेव्हा त्याचा मालक त्याला शब्दात बोल्ला की, " एका दिवसाच्या कामात तु तुझे नशीब काढलेस !

Tuesday, December 11, 2018

School Poster

School Poster

ठाणे जिल्ह्यातील एका शाळेत राहुल नावाचा मुलगा शिकत होता. अक्षय शाळेत हुशार असुन खोड्कर जास्त होता. एकदा शाळेत अक्षयने लहान टाॅच आणली होती. मग तेव्हा हिंदीचा तास चालु होता. तेव्हा सर शिकवत होते. सरांनी चष्मा  घातला होता तेव्हा त्याने विचार केला की सरांच्या चष्मावर लाईट मारुन बघु म्हणुन त्याने सरांच्या चष्मावर लाईट मारली . तेव्हा सरांना खुप राग आला  तेव्हा सरांनी त्याला खुप मारले. मग दुसरा दिवशी त्याने रागात सरांचा उघडा फ़ोटो शाळेच्या नोटिस बोर्डवर लावला. तेव्हा सरांनी चौकशी केल्यावर लावणारा शेवटपर्यत सापडलाच नाही.

Monday, December 10, 2018

शेजारी(Neighbours)

                                               
                                 शेजारी(Neighbours
        एका गावात अजय नावाचा मुलगा राहत होता. त्याने आताच गेल्या महिन्यात १0 वी चा रिझल्ट शाळेतुन आणला होता. त्यामुळे तो कामाच्या शोधात मुंबई शहरात गेला. एका कंपनीत त्याला काम मिळाले, पण राहण्याची सोय नव्हती. तेव्हा त्याचे जवळचे शेजारचे तेथे राहत हेते. तर त्याच्याकडे तो रोज राहुन कामाला जात होता. काम त्याचे आवडीचे असल्याने त्याला दुसरा ठिकाणी काम मिळत नव्हते. म्हणुन त्याला जबरदस्ती तेथे राहुन काम करावे लागले. दोन महिने झाल्यावर शेजारचे त्याला विचाराला सुरुवात केली, कि तुला दुसरीकडे काम कधी मिळेल ? लवकर काम बघ ! येथे जागा नाही ! अशाप्रकारे त्याला त्याच्या शेजारचे त्रास द्याला सुरुवात केली.

Sunday, December 9, 2018

नातेवाईक



 एका गावात अजय नावाचा मुलगा राहत होता. त्याने आताच गेल्या महिन्यात १५ वी चा रिझल्ट शाळेतुन आणला होता. त्यामुळे तो कामाच्या शोधात मुंबई शहरात गेला. एका कंपनीत त्याला काम मिळाले, पण राहण्याची सोय नव्हती. तेव्हा त्याचे जवळचे नातेवाईक तेथे राहत हेते. तर त्याच्याकडे तो रोज राहुन कामाला जात होता. काम त्याचे आवडीचे असल्याने त्याला दुसरा ठिकाणी काम मिळत नव्हते. म्हणुन त्याला जबरदस्ती तेथे राहुन काम करावे लागले. दोन महिने झाल्यावर नातेवाईकांनी त्याला विचाराला सुरुवात केली, कि तुला दुसरीकडे काम कधी मिळेल ? लवकर काम बघ ! येथे जागा नाही ! अशाप्रकारे त्याला त्याच्या नातेवाईकांनी त्रास द्याला सुरुवात केली.

Saturday, December 8, 2018

Mobile Part - 5








                                     *******Story Uploaded for Few Minutes*******