Translate

Friday, November 2, 2018

मुंगुस

                                      मुंगुस
    एक विश्वास नावाचा मुलगा होता. तो नुकताच १०वी ला होता. शाळेत गेल्यावर मुलांशी मस्ती आणि सरांचा मार खाणे असा त्याचा स्वभाव असला तरी घरात त्याची वागणुक चांगली होती. एकदा असाच शाळेतुन घरी जात होता. अचानक त्याला रस्त्यात एक मोठा मुंगुस दिसला. मुंगुस बघताच तो थोडा घाबरला, तो मुंगुस १० मी. तिथेच असल्याने त्याला वाटले की, तो कुणाच्यातरी शोधात आहे. असे त्याला वाटले, मग मुंगुस गेल्यावर तो घरी गेला. घरी गेल्यावर घराच्या बाजुला लोकांची गर्दी जमली. त्याने घरात पाहुण बघितले तर, घरात रक्ताचे डाग होते. आणि किच्चनच्या रुममध्ये रक्ताचे प्रमाण जास्त असल्याने त्याने पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याने पाहिले तर तो तिथेच हादरला. " एक मोठा साप मरुण पडला आहे, आणि त्याचे रक्त सगळीकडे पाणगले आहे." तेव्हा बाजुचे काका घरात आले. मग त्यांनी त्याला सांगितले की तुझ्या घरात साप घुसलेला, आणि त्या सापाच्या मागे एक मुंगुस होता. त्या मुंगुसाने त्याला मारले असावे, असा अंदाज होता. तेव्हा विश्वासला लगेच लक्षात आले की आपण रस्त्यात जो मुंगुस बघितलेला होता. तो तोच होता म्हणुन. मग घरात कोणीच नसल्याने घरातुन साप बाहेर काढला, व पुर्ण घर साप केले. मग घरात त्याची आई आल्यावर झालेला प्रकार त्याने सांगितला.

Thursday, November 1, 2018

घोण

                                       घोण 
       एका लहानशा खेडेगावात करण नावाचा एक मुलगा राहत होता. तो तिसरीमध्ये शिकत होता. सकाळी १० वा. शाळेत गेल्यावर दुपारी २ वा. घरी जेवायला यायचा आणि जेवुन लगेच शाळेत जायचा. ५.५० वा. शाळा सुटली की तो घरी यायचा. घरी आई-बाबा, एक लहान बहिण २ वर्षाची. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेल्यावर दुपारी जेवायला घरी आला. जेवायला आल्यावर आईने जेवणाचे ताट वाढले, आणि आई बाहेर गेली. तेथे त्याची छोटी बहिण खेळत होती. अचानक तिथे एक मोठी घोण आली. मग हे करणने बघितले, मग करणने त्या घोणचा रस्ता आडवण्याचा खुप प्रयत्न केला. पण ती घोण थांबतच नव्हती. सारखी पुढे येत होती. मग घरात एक मोठी काठी होती. त्या काठीने त्या घोणला मारले. त्या घोणचे दोन तुकडे केले, तरीही ती जिवंत असल्याचे त्याला आढळले. मग त्याने बतितले राॅकल त्या घोणवर ओतले आणि आग लावली. तेवढयात त्याची आई आली आणि म्हणाली, काय पेटवलेस ? मग तो बोल्ला की घोण आहे. हे बोलताच तो शाळेत गेला. शाळेत गेल्यावर हा प्रकार मित्रांना सांगितला तर मित्रांनी त्याची वाह ! वाह ! केली.

Wednesday, October 31, 2018

माणुस्की

                                            माणुस्की
   एकदा एका बाईचा रस्त्यावर निधन झाले. तेव्हा त्या बाईला बघण्यासाठी खुप लोक आली होते. एवढे लोक होते की, एखादा हिरोला बघायला जेवढी माणसे असतील तेवढी इथे होती. तेव्हा गावातील खुप लोक तेथे आले होते. मग तिची पुर्ण क्रिया होपर्यत माणसे तिथेच होती. त्या बाईची मुले होती. त्या मुलांना तिच आधार होती. आणि तिच त्यांना सोडुन गेल्यामुळे लोकांमध्ये चर्चेचे वातावरण निर्माण झाले. मग तेव्हा त्या मुलांना काही माणसांनी धिर दिला. मग तेथे एक बाई म्हणाली की, ही बाई माणस्कीला खुप चांगली होती. शेवटी राहिली ती, त्या बाईची माणुस्की..
    

            *** समाप्त ***

Tuesday, October 30, 2018

पुरस्कार

                                             पुरस्कार 
रावेल नावाचे एक गाव होते. त्या गावात एकदा निबंधाची स्पर्धा होती. त्या स्पर्धेत अट अशी होती की, एक शब्द चुकला की परत सुरुवातपासुन चालु करणे. मग स्पर्धेत १५०० लोकांनी भाग घेतला होता. त्यात १००० मुले तर  ५०० माणसांचा समावेश होता. मग हि स्पर्धा ९ वाजता सुरुवात झाली. त्यात वेळ १ तासाची होती. मग त्यात शेवटी एक मुलगा जिकला. मग त्याला ग्रामसेवकाने पुरस्कार जाहिर केला.

Monday, October 29, 2018

ग्रामपंचायत

                                             ग्रामपंचायत
      घोण नावाचे एक गाव होते. त्या गावात एकदा सरपंच पदासाठी जागा निघाल्या. पदासाठी बाहेरच्या गावातील उमेद्वार उभे होते. मग घोण गावासाठी एक २ री शिकलेली बाई उभी राहिली. तेव्हा ती बाई बिनविरोधी निवडुन आली. सरपंच म्हणुन निवड झाल्यानंतर दुसरा दिवशी ती कार्यालयात गेली तेव्हा एका मानसाने तिच्याकडुन सही मागितली तर ती म्हणाली अंगठा चालेल का? तेव्हा तेथे दिन मानसे तिला बघुन हसु लागली.
एकदा १५ ऑगस्टला भाषण होते तेव्हा त्या बाईची बारी होती. मग ती स्टेजवर आली तेव्हा ती म्हणाली आज १५ ऑगस्टला आहे. हे बोलुन भाषण संपवते हे बोलुन तिने भाषण संपवले. मग ती बाहेर आली. अशी अडाणी बाई असताना तिला गावाने सरपंच कसे बनवले ? ग्रामपंचायत कशी अशी ? असा प्रश्न त्या बाहेरील गावातील लोकांना पडला.

Sunday, October 28, 2018

शाळा

                                                    शाळा
     रोळ नावाचे एक गाव होते. त्या गावाची लोकसंख्या २० घरे अशी होती. त्या गावात एक शाळा होती. त्या शाळेत २० मुले शिकत होती. त्या शाळेत एकदा घटना घडली, एकदा शाळेत एक विषारी साप आला. तो सर्वात पहिले २ विद्यार्थांना चावला. तेव्हा शिक्षकांनी हे सर्व पाहिले. मग शिक्षकांनी सापाला मारण्याचा प्रयत्न केला. पण ते अयशस्वी ठरले. शेवटी एका विद्यार्थाने साहस करुन सापावर टेबलाने हल्ला केला तर, तो मुळात जखमी झाला. शेवटी एक मोठा दगड डोक्यात घातला आणि साप मेला.

Saturday, October 27, 2018

शेती

                                                     शेती
       एका गावात राम नावाचा मुलगा राह्त होता. तो शेती करत असे. त्याला शेती करायला फ़ार आवडत असे.

                                                                                   एकदा त्याला शेतात एक साप दिसला, तो एक नाग होता.
 
 आणि त्याच्या कपाळावर काही चमकत होते. म्हणुन राम जवळ गेला तर्, त्याला एक कपाळावर मणी दिसला.
 
 मग तो मणी घेण्यासाठी त्याने सापाला मारण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. तेव्हा त्याने सापाचा मणी घेतला. आणि सरळ त्याने बाजाराकडे धाव घेतली. बाजारात दुकानात मणी पाह़्ताच दुकानदार समजला की, मणी अनमोल आहे.
 
 मग त्या दुकानदाराने त्याला पैसे दिले. आणि हे सर्व करताना एका माणसाने पाहिले. मग त्या मानसाने त्याचा पाठलाग केला आणि शेवटी रामला वाटले कि कोणतरी आपला पाठलाग करतो. म्हणुन बघितले तर तेवढयात रामवर जोराचा हल्ला झाला. त्या हल्लात राम मेला. मग रामचे शरिर त्याच्या शेतात टाकले. जिथे रामने एक साप मारला होता, तोही त्याच्या शेतात. त्यामुळे त्याच्या मरणाला तोच कारण झाला.