Translate

Saturday, October 20, 2018

लालच चे फ़ळ कधीही वाईट असते

       

एका गावात अजय आणि आकाश नावाने दोन मित्र राहत होते.  सुरज हा चांगल्या घरातला होता. तर आकाश हा गरिब होता. तरीही दोघांमध्ये वय समान होते.  

ते दोघे ५वी च्या वर्गात शिकत होते. उनाळाच्या सुट्टया पडल्यामुळे दिघांना वाटले की काहीतरी वेगळे करायला हवे. मग त्यांनी त्यांच्या आजोबांच्या तोंडून एकदा ऐकले होते की, जंगलात काही जादू सारखे आहे. ते कोणालाच मिळत नाही.
    
  काही वेगळं घेण्याच्या शोधात गेले. तेव्हा एका घनदाट जंगलात गेले. तेथे त्यांना एक दगड मिळाला. दगड सामान्यच वाटत होता. तेव्हा आकाशला खुप तहान लागली होती तेव्हा त्या दगडातून पाणी येताना आकाशने पाहिले पाणी पिताना अचानक दगड कमकुवत आहे. हे अजयच्या लक्षात आल्यावर त्याने आकाशला मागे ओढले.

 मग अजयने तो दगड तोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दगडातुन काहीतरी दिसले. ते पाहण्यासाठी दोघांनी दगड तोडण्याचा प्रयत्न केला. दगडाचा जोरात आवाज झाला आणि दगडातुन एक हिरवा रंगाचा चमकणारा दगड निघाला.
    
  तो दगड घेऊन दोघे घरी गेले. रस्त्यात आकाश अजयला बोल्ला की हा दगड आज माझ्याकडे ठेवतो. उद्या तु ठेव. असे बोलुन दोघे घरी गेले. मग आकाश घरी गेला तेव्हा त्याच्या घरात कळले होते की तो जंगलात गेला होता. मग तो तेव्हा एकटाच मनात विचार लागला की, माझ्याबद्दल सर्व विसरुन जाऊदे. आणि ते खरे होते. तेव्हा आकाश घाबरतो लगेच अजयकडे जाऊन संपुर्ण घटना सांगतो. तेव्हा अजय बोल्ला की तु गरीब आहेस तर तुझ्यासाठी मोठे घर माग. तेव्हा ते दोघे आकाशच्या घरी जाऊन पाहतात. तर घर मोठे झालेले दिसते. मग आकाश अजुन एकदा असे मागतो की, मी धनवान व्हावा. तेव्हा त्याचे कपडे क्षणात बदलतात. मग आकाश म्हणतो की या दगडाची आता मला काहीच गरच नाही तेव्हा तो दगड अजय स्वत: कडे ठेवतो. आणि तो मागतो की माझ्याकडे पैशाची कमतरता कधीच भासू नये. जेथे नजर जाईल तेथे पैसाच मिळेल. तेव्हा त्याच्या सभोवती वस्तू गायब होऊन त्याला सगळीकडे पेैसे दिसतात.
 
 मग थोड्या वेळाने त्याला भुक लागते, तेव्हा तो त्या दगडाकडे बघायला जातो तर दगडही पेैसे झालेले दिसते. त्यामुळे तो तेथे त्रासुन जातो आणि शेवटी आत्महत्या करतो.
   
                                      *** समाप्त ***         

Friday, October 19, 2018

मेहनतीचे फ़ळ कधीही चांगले मिळते


    एका गावात एक तरुण करण नावाने मुलगा राहत होता. त्याचे वय २२. तो काम करुन शिकत होता.

 एकदा त्याने UPSC चा फ़ार्म भरला. त्यावेळेस त्याच्या कामातील काही कामगार त्याच्यावर हसत होते. मग त्यावेळेस त्याने या गोष्टीचा फ़ारसा विचार केला नाही.
  
 परिक्षाचा दिवस होता त्याला कामातील लोकांनी शुभेछा दिल्या. मग परिक्षेचा निकाल चांगला आला नाही. तेव्हा क्षणभर त्याला दु:ख झाले. तेव्हा ही गोष्ट कामातील मॅनेजरला कळली. मग मॅनेजरने त्याला कामाची ऑफ़र दिली. की Diploma Course करुन घे. म्हणजेच तुला मी इथे कायमस्वरुपी कामावर ठेवतो. मग हे ऐकुण तो खुप मेहनत करु लागला.
  
  शिक्षण झाल्यावर त्याला साहेबांनी चांगल्या जागी कायमस्वरुपी कामावर ठेवले. तेव्हा त्याच्यावर हसणारे काही कामगार त्याच्याकडे बघुन स्वत:चे तोंड लपवत होते. शेवटी त्याचा मालक तेथे आला आणि त्या लोकांसमोर त्याचे काैतुक केले.

Thursday, October 18, 2018

टाईमपास

     एका गावात एक दिनु नावाचा एक व्यापारी राहत होता. तो अन्नधान्याचा व्यापारी होता.

  पाऊस आल्याने तो त्याचा दुकानाच्या समोर लावलेला धान्याच्या पोती तो दुकानात घेऊ लागला. तेवढयात एक माणूस त्याच्या दुकानाच्या बाहेर आला. व्यपारीचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. त्या माणसाने शेतकराला मोठयाने हाक मारली, "अहो दादा, जरा एेकाल का माझं ? माझं तुमच्याकडे एक काम आहे."
  
 व्यापारीने हातातले काम ठेवून त्याला विचारले की काय हवं आहे ! तेव्हा तो माणूस म्हणाला की एक भिकारी आहे. मला भूक लागली आहे. मला खाण्यासाठी अन्न हवयं !"
   
        व्यापारी म्हणाला, "चल माझ्यासोबत." आता आपल्याला काहीतरी खायला मिळेल; म्हणून तो भिकारी  व्यापारीसोबत दुकानाबाहेर गेला आणि राहिलेल्या पोती उचलायला लावली. नंतर त्याला म्हणाला, "जा,  आता माझ्या कामाचा जेवढा खोळंबा तू केलास , तेवढं काम तू केलं आहेस."

       मग भिकारी म्हणाला, दादा मला जेवण ?"

      "आज माझ्याजवळ काही नाही. मी तुला कोणतीच मद्द करु शकत नाही. " हे ऐकताच भिकरी चिडून म्हणाला, जर हेच सांगायचं होतं तर आधी का नाही सांगितले.

      व्यापारी म्हणाला तुला अन्न हवं होते. ते कळले मला पण माझ्या धाण्याच्या पोती पाऊसाच्या पाण्याने भिजले त्याचे काय? मग तु जर थोडावेळ थांबला असता तर माझे नुकसान झाले नसते. तेव्हा भिकारीने व्यापाराची क्षमा मागितली.

मग व्यापाराने त्याला घरी नेले व पोटभर जेवण दिले.

                                      *** समाप्त ***

Wednesday, October 17, 2018

मोबाईल (एक अपघात)

        

   एक बोरीवली नावाचे शहर होते. त्या शहरामध्ये एक मयुर नावाचा मुलगा राहत होता.  त्याला १० वीत ६५% गुण मिळाल्यामुळे त्याचे अॅडमिशन एका कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमध्ये त्याचे नवीन मित्र झाले. काही मित्रांकडे मोबाईल होते
 
 त्यामुळे त्यालाही वाटत होते की, आपल्याकडे मोबाईल असावा. मग त्यादिवशी त्याने आपल्या वडिलांकडे मोबाईलची मागणी केली. पण वडिलांनी त्याला मोबाईलसाठी नकार दिला. मग त्याने विचार केला की काम करुन मोबाईल घ्यायचा. तो अंधेरीमध्ये रोज कॉलेजला जायचा त्यामुळे त्याचा लोकलने प्रवास होत असे.
   एकेदिवशी कॉलेजमधुन निघायला उशीर झाल्यामुळे त्याने चालत्या लोकलला पकडण्याचा प्रयत्न केला. आणि त्याने ती लोकल पकडली. कारण समोरच्या एका प्रवाशाने त्याचे हात पकडल्यामुळे तो लोकल पकडू शकला; मग त्यादिवशीचा लोकलचा प्रवास त्याने घरात कुणालाच सांगितला नाही.
  
 काही दिवसानी तो एक छोटेमोठे अर्धदिवसाचे काम करु लागला. आणि त्याच्याकडे मोबाईल घेण्याइतके पैसे झाल्याने त्याने विचार केला की मोबाईल कॉलेज सुटल्यावर एका चांगल्या दुकानातुन घ्यायचा. मग दुसरा दिवशी तो मोबाईलच्या दुकानातुन बाहेर येताना त्याला लक्षात आले की खुप वेळ झाला आहे, आता लवकरात लवकर घरी गेले पाहिजे. त्यामुळे त्याने घरी जाण्यासाठी धाव घेतली. स्टेशनवर पोचल्यावर त्याची लोकल सुटताना त्याला दिसला. त्याने जोरात लोकलकडे धाव घेतली. लोकलचा लोखंडी खांब त्याने जोरात पकडल्याने तो लोकलमध्ये चढला पण त्याची पक्कड घट्ट नव्हती. कारण एका हातात मोबाईल असल्याने त्याची पकड सैल होती. अचानक त्याच्या हातातुन मोबाईल रेलवेच्या बाहेर पडला. मोबाईल पडताच त्याने लोकलमधुन उडी मारली. उडी मारल्यामुळे पडलेला मोबाईल मिळाला पण अचानक समोरुन लोकल आली आणि त्याचे जागीच  

प्राण गेले. तेव्हा लोकलमधील त्याचे काही मित्र त्याला शोधत येताना त्याचे शरिर त्यांना मिळाले. त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवले

 त्यावेळी त्याचा एक मित्र तेथे म्हटला की जर त्याच्या हातात मोबाईल नसता तर, हा प्रसंग बघायला मिळालाच नसता..

                                           *** समाप्त ***