Translate

Tuesday, October 16, 2018

धाडसी रोशन

        

    पालघर तालुक्यातील नालासोपारा गावात एक रोशन नावाने मुलगा राहत होता. त्याचे शिक्षण १५ वी पास असल्याने त्याला गोरेगावात एका मोठया कंपनीत नोकरी मिळाली
 
 त्याचे काम बघुन ऑफ़िसमधले सर्वजण त्याला ओळखु लागले.   मुळात तो मे महिन्यात कामाला लागल्याने च्याचे काम कंपनीच्या मालकाला एवढे आवडले. की त्याला कंपनीच्या मालकाने बोलावुन त्याची स्वतंत्र भेट घेतली त्याचे कौतुक केले. त्यामुळे ऑफ़िसमधले त्याचे एक व्यक्तीचित्र तयार झाले. आणि तो सगळयांचा आवडता झाला.
रोज सकाळी :०० वाजता उठून मग :१० मी. स्टेशनवर पोहचायचे आणि .२० ची अंधेरी लोकल   पकडून ऑफ़िसमध्ये :३० ला पोहचणे. 
आणि ऑफ़िसमध्ये पोचल्यावर मग ऑफ़िसची कामे करुन :३० ला सुटून :५० ची लोकल पकडावी लागे. लोकलला प्रचंड गर्दी असतानाही कसेबसे घरी पोहचणे. असा त्याचा रोजचा दिनचक्र होता. जुनचा महिना लागला आणि पाऊसाला सुरुवात झाली. रोज सकाळ संध्याकाळ पाऊस पडल्याने प्रवासात त्रास होत असे.
 एका दिवशी रात्रभर भरपुर पाऊस पडला त्यामुळे सकाळीच रेलवे स्टेशनवर भरपुर पाऊसाचे पाणी साचले.  
 
तरीही कामाला जाणार कसे ? हा प्रश्न त्याला पडला. मग कसेबसे पाण्यातुन चालत जाऊन  रेलवे स्टेशनवर पोहचला. पण तेथे पोहचल्यावर त्याला कळले की गाड्या २० मी. उशीराने धावत आहेत. तरीही त्याने ऑफ़िसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. आणि तो ऑफ़िसमध्ये :३० मी पोहचला

  ऑफ़िसमध्ये बहुतेकजण आलेच नाही तरीही त्याने आपले कामाच्या जबाबदारीमुळे हे सर्व केले. नंतर ऑफ़िसमधुन बाहेर आल्यावर स्टेशनवरुन लोकल पकडली. नालासोपारा स्टेशनला पोहचल्यावर पायभर पाणी. मग कसेबसे घराचा रस्ता बघितला आणि इतर प्रवाशींसोबत जाऊ लागला. रस्त्यात प्रवाशी कमी होऊ लागले. रस्त्याने तो एक्टाच होता. अचानक जोराचा वारा आणि पाऊस सुरु झाला. वारामुळे विजेची तार तुटून रस्त्यावर पडली. त्याने आजुबाजुला पाहिले तर त्याला इतर ठिकाणी विजेची बल्प चालु असलेले त्याच्या नजरेस आले.  
 
तेव्हा त्याने त्याक्षणी विज-ऑफ़िसला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण कॉल लागला नाही. अचानक गॅस-सिलेंडरची गाडी पाण्यातुन येताना दिसली. त्याने विचार केला की जर की विज बंद कशी करावी, तेव्हा त्याला आठवले की रस्त्यात विजेचा डेपो होता. मग कसाबसा कडेकडेनी जाऊन त्याने विज बंद केली




 त्यावेळेस रस्यावरची लोकं त्याला पाहत होती पण त्यांना हे माहीत नव्हते की पुढच्या रस्त्यावर विजेची तार पडली आहे. मग जेव्हा लोकांना कळले की विजेची तार पडल्यामुळे त्याने विज बंद केली. हे कळल्यावर गावातील लोकांनी त्याचे कौतुक केले. आणि दुसरा दिवशी गावातील सरपंचानी त्याचे कौतुक करुन त्याचा सत्कार केला. ऑफ़िसमध्येही त्याचे भरभरुन सर्वांनी कौतुक केले.


                                         *** समाप्त ***

Monday, October 15, 2018

जंगलातील फ़ुले (एक करमणूक)

  रायगड जिल्यातील कर्जत तालुक्यातील एका गावात मी गेलो. त्या गावाच्या सुरुवातीस जंगलाचा रस्ता लागला. रस्त्यात मला वेगवेगळ्या प्रकारची फ़ुले होती.
  त्यात पहिले फ़ुलतर पिवळ्या रंगाचे. दिसायला आकर्षक व सुगंध नसनारा.


 
   दुसरे फ़ुल म्हणजे ते एका नारळाच्या कवटीसारखे आणि त्यात पावसाचे पाणी पडल्यावर त्याची सुंदरता शोभून दिसते.



  तिसरे फ़ुल म्हणजेच नुकतेच मोगराच्या फ़ुलासारखे दिसत होते. पण ते फ़ुल सफ़ेद रंगाचे होते.  पण त्याचा सुगंध नव्हता.


     असे खुप वेगवेगळ्या प्रकारची फ़ुले मी तिथे पाहिली. आणि नंतर मी तिथून निघुन आलो.
 
                                                       *** समाप्त ***

Sunday, October 14, 2018

पक्के मित्र (एक काल्पनिक कथा)

      एक अनगाव नावाचे गाव होते. त्या गावात दोन मित्र होती. एका मित्राचे नाव दत्ता तर दुसरा मित्राचे नाव राहुल होते.
 

 ते दोघे एका वर्गात शिकत असताना त्यांची एकमेकांवर जिवापाड मैत्री होती.
 

 एकदा वार्षिक परिक्षा जवळ आली. दोघे अभ्यासात हुशार असताना दत्ता हुशार तर राहुल हुशार नव्हता पण परिक्षा आली की परिक्षेत कॉपी करायची तिही सरांच्या न कळत. मग परिक्षेचा पहिला दिवस आणि दोघे पेपर द्यायला बसले. पेपर लिहताना अचानक दत्ताकडे कॉपी सापडली.
 

         ती कॉपी राहुलची असताना राहुलने दत्ताचे मुद्दावून नाव घेतले नाही. तरीही दत्तावर कॉपी करायचा आरोप लागला.तेव्हा दत्ताला भरपुर राग आला आणि तेव्हापासुने दत्ताने राहुलची मैत्री तोडली.
  एके दिवशी दत्ताला शाळेत जायला उशीर झाला म्हणून दत्ताने वडिलांची गाडी घेतली. शाळेत येताना राहुललाही उशीर झालेला. कारण शाळा सकाळची होती.
 

       मग शाळेत येताना रस्त्यात दत्ताच्या गाडीचा अॅक्सिडन झालेला दिसला. राहुलने दत्ताला वेळीच दवाखान्यात पोचवले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले पण दत्ता जेव्हा शुधिवर आला तेव्हा हा सर्व प्रकार त्याच्या वडीलांनी सांगितला
 

       तेव्हा दत्ता राहुलला भेटायला गेला. मग त्यादिवशीचा सर्व प्रकार राहुलने सांगितला. तेव्हा दत्ताचा राग शांत झाला पण दत्ताला हे माहित नव्हते की त्याला राहुलने वाचवले होते. मग त्यावेळी दत्ताचे वडिल तेथे आले आणि त्याला जेव्हा आपले प्राण वाचवल्याचे कळले, तेव्हा त्याच्या डोळयात पाणी आले.


   आणि त्यानी राहुलचे आभार व माफ़ी मागितली. मग त्यादिवशीपासून दोघे पक्के मित्र झाले.


                                         *** समाप्त ***

Saturday, October 13, 2018

पाटिल बंधू ( एक रिक्शावाला )

              रत्नागिरी जिल्यातील पावस नावाचे एक गाव होते. त्या गावात दिपक पाटील नावाने एक रिक्शावाला राहत होते. त्याला गावातील सर्व लोक पाटील बंधू असे म्हणत. पाटील गावात एकटेच होते. ते १५वीत असताना आई-वडीलांचे बस अपघातात दु:खद निधन झाले.  तेव्हा ते नुकतेच २२ वर्षाचे होते. ते नोकरीच्या शोधात मुंबईला एकदा-दोनदा जाऊन आले पण हवी तशी नोकरी मिळालीच नाही म्हणून जबरदस्तीने त्याला रिक्शा चालवावी लागली.
    एकदा गावात एक नविन पाहुणे आले होते. तेव्हा पाटिलांनी त्यांना बसस्टॅापवरुन गावात आणले. गावात आल्यावर पाटिलांनी प्रवासींचे सर्व सामान रिक्शातुन बाहेर ठेवले आणि पाटिल तिथुन निघुन गेले.



 कारण हे गाव पावस गावापासुन २० कि.मी अंतरावर होते. म्हणून पाटलांनी प्रवाशींकडे घाई करुन त्यांच्याकडून पैसे घेतले आणि तिथून निघुन गेले. पाटील गेल्यावर प्रवाशांनी त्यांचे सर्व सामान घरात घेताना एक बॅग तर रिक्शातच राहिली. मग आता ती बॅग आता कशी मिळेल, या चिंतेने ही बाब पुर्ण गावभर पसरली. गावातल्या काही लोकांनी पाटिलला आलेले पाहिले होते. त्यावेळी त्यांनी पाटीलांबद्दल काहीच सांगितले नाही. गावात पाहुणी नविन असल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनादेखिल पाटीलांबद्दल काहीच माहीत नव्हते. म्हणून पाटलांवर नुकताच संशय घेतला. दुसरा दिवशी पाटिल गावात आले तेव्हा त्या प्रवाशांनी त्यांना पाहताच शिवीगाळ करायला सुरुवात केली. पाटील बॅग परत करायला आले आहेत हे त्यांना माहितच नव्हते. पाटलांना हा प्रकार आवडला नाही म्हणून पाटलांना कडक आवाजात म्हटले,

 
  " तुमची वस्तु परत करायला आलो आणि तुम्ही माणसाला न आेळखता त्यावर आरोप कसा लावू शकता ?" लगेचच पाटलांनी रिक्शातून बॅग आणली आणि घरात प्रवाशीला दिली. बॅग देताच घरातील सर्वाचा राग शनातच गायब झाला. मग प्रवाशींनी पाटलांची माफी मागितली.


                                         *** समारोप ***

Friday, October 12, 2018

बाकी शंभर रुपयांचं काय ? ( एक काल्पनिक कथा )

                                  बाकी शंभर रुपयांचं काय ?
 
               "मी आत येऊ शकतो का सर ?" हातातल्या फ़ाइली सावरत विश्वासने विचारले. साहेब कुठलीतरी फ़ाइल पाहत होते. त्यांनी मान हालवून हो म्हटले.  आवाजावरुन त्यांनी विश्वास आत आल्याचे वर न पाहताच ओळखले अन तक्रारीच्या सुरात बोलले, 

 
              "विश्वाससर, कालच्या त्या मुलानं दोनशे रुपयांना फ़सवलं. तुम्च्यामुळं हे सारं घडलं. ही मुलं कामचुकार असतात.  तुम्हांला त्याचा कसा पुळका आला तेच मला कळत नाही. दोनशेची नोट घेऊन गेला तो गेलाच ! बघा, त्याची चिकन हंडी मला दोनशेला पडली." एका दमात साहेबांनी मनातली नाराजी व्यक्त केली. क्षणभर विश्वासला वाटले, आपण खिशातून साहेबांना शंभर रुपये काढून द्यावे; म्हणजेच सकाळची कटकट एकाची जाईल. असा विश्वासने विचार केला. पण त्याने तसे केले नाही. तो साहेबांच्या समाधानासाठी म्हणाला, "तसं नसेल सर, काही अडचण आली असेल त्याला म्हणून... "काही सांगू नका, यानंतर असली मुलं कार्यालयात आलेली मला चालणार नाहीत. समजले?" साहेब म्हणाले. नाइलाजाने विश्वास "हो" बोल्ला. साहेब म्हणतात ते बरोबर होते, तरी ते संपुर्ण बरोबर नसावे, असे विश्वासचे मन  त्याला सारखे सांगत होते. करण हा मुलगा फ़सवाफ़सवी करणारा वाटत नव्हता. मागच्या महिन्यापासून विश्वास त्याला ओळखत होता. विश्वासची मेहुणी प्राईवेट दवाखान्यात दाखल झाली होती. विश्वास सकाळ-संध्याकाळ तिला भेलायला आणि जेवणाचा पोहोचवायला जात असे.

 

            दवाखान्याच्या बाजुला त्याचे आॅफ़िस होते. एक दिवस एका मुलाने त्याचे लक्ष वेधुन घेतले. फ़ार २२-२३ वर्षाचा मुलगा असावा. त्याच्याजवळ एक पोस्टर होता. त्यावर त्याने "उरलेले अन्न" देण्याचे आवाहन केले होते. त्याच्या हातात एक बाॅक्स होता. तो पाहुण त्यात काही अन्न असावे असे वाटत होते.  त्याला पाहुण विश्वासची उत्सुक्ता फ़ारच वाढली. 
        त्याने एक दिवस त्याला बाजुला घेतला अन बरेच काही विचारले, "तुझं नाव काय ? तु कुठला ? येथे का आलास ? कोणत्या वर्गात शिकतोस ? वगैरे. साहेब ज्या मुलाविषयी बोलले होते तोच हा करण. तो रत्नागिरी जिल्ह्यातील एका खेडेगावाचा. १५वी शिकणारा. त्याची आई आजारी असल्याने तिला प्राईवेट दवाखान्यात भरती करावे लागले. तो आणि त्याची आई याशिवाय घरी तिसरे कोणी नव्हते. एका झोपडीच्या घराशिवाय त्याच्याकडे काही नव्हते. दवाखान्यात आईजवळ सतत बसून राहण्याचा त्याला कंटाळा येई. आईला विचारुन तो इकडेतिकडे फ़िरे. आईने त्याला सांगितले होते, "जास्त लांब जाऊ नको.   म्हणून लांब न जात नसे. त्यावेळी करणला भुक लागली म्हणुन आईला बोलला की मी जरा जाऊन येतो.                                                              
 

          असे बोलुन करण तिथुन निघुन जातो. दवाखान्यातुन बाहेर आल्यावर करणला जोरात भुक लागली होती म्हणून करण एका हाॅटेलमघ्ये जातो आणि दोन चिकण हँडी ऑडॆर करतो. एक चिकण हँडी तो स्वत: खायचा. एक पार्सल विश्वासला घेऊन जायचा. पण एका दिवशी विश्वासला सरांसाठी पार्सल चिकण हँडी  पोचायला उशीर झाला, म्हणून विश्वासने चिकण हँडी करणला पोचवायला सांगितले. चिकण हँडीचे पैसे करणला दिले. पण विश्वासकडे सरांनी दिलेली २०० रुपयाची नोट सुट्टी नसताना करण बोल्ला की मी सुट्टी करुन येतो आणि आलाच नाही. करणने साहेबांना खरंच फ़सवले असेल का ? विश्वास विचारात पडला. तेवढ्यात करणचा मित्र पैसे घेऊन येतो. आणि बोलता-बोलता खिशातुन २०० रुपयाची नोट काढतो. ती नोट साहेबांसमोर धरत म्हणाला, "सर, ही नोट करणने तुम्हाला द्याला सांगितली आहे." विश्वास आणि सर दोघेही चकित झाले. करण कुठे आहे ? विश्वासने विचारले, "सर, तो कालच गावाला गेला." साहेब म्हणाले, का ? कारण सर त्याच्या मामाच्या पोरीचे लग्न जमला आहे, म्हणून तो गावाला गेला आहे. गावाला जाण्याआधी त्याने ही नोट तुम्हांला द्यायला सांगितले. असे बोलताच तो बाहेर जातो.
       मग तेव्हा साहेब विश्वासला म्हणाले, विश्वास मला माफ कर. असे म्हणताच विश्वास साहेबांना म्हणतो की मी की यातले शंभर रुपये माझ्या खिशातले आहे. यावर सर बोलतात की बाकी शंभर कुठे आहेत ? यावर विश्वास रागाने सरांना बोलतो की, तुम्ही जी चिकण हँडी खाल्ली ती शंभरची होती. मग आता बोला बाकी किती राहिली ? यावर सर गप्प राहिले आणि तेथुन निघुन गेले. 



                             *** समाप्त ***

Thursday, October 11, 2018

बाबूची इजार

                                          बाबूची इजार

        रत्नागिरी गावचा बाबू शांत व कष्टाळू शेतकरी होता. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव होता. सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा होत असे. सकाळी लवकर शेतात जायचं आणि दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं आणि घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं. कट्टयावर चक्कर मारायची अन जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं, असा त्याचा दिनक्रम !
          सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी, अन नाकासमोर चालणारा बाबू. एकावषीॅ पिकपाणी बरं झाल्यावर बाबूनं कुटुंबासाठी नवे कपडे अन स्वत:साठी इजार शिवली. धोंडूमामांनी कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला ! पुढे...

 

 

 

 

           आईने इजार एका कोनाडयात फ़ेकली. बाबू हिरमुसला होऊन शेताकडे गेला.
                                                                                                        बाबुची बायको इजारीचे पाय कापते
                                                                                                          अन दुमडून टाके घालते. 
 

बाबुची बहिण इजारीचे पाय कापते. दुमडून टाके घालते.
 
                                                                                              बाबुची आई इजारीचे पाय कापते                                                                                                अन दुमडून टाके घालते.  
  
                                                                                                       बाबू इजारीचे पाय चार बोटं कापतो व
                                                                                                                 टाके घालतो.

 
                                                                                                
                                                                                                सगळेजण आश्चयाने पाहतात.
 


                                       *** समाप्त ***

Wednesday, October 10, 2018

शेरास सव्वाशेर

                                        शेरास सव्वाशेर
  
         नानाकाका घुंगरकाठी आपटत शेताच्या बांधावरुन फ़िरुत होते. वारावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते. निब्बर, सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक ! नंतर कापणी, झोडणी, मळणी आणि मग कणगीत पडेल वषॅभराची बेगमी, असा विचार त्यांच्या मनात येत होता. 
        "निसगाॅने करूणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली," असे गाणे गुणगुणत नानाकाका माळावरच्या शेतापाशी थांबले. दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या. शेताची नासाडी चालू होती. शेतावर उंदिरमामा कोपले होते. नानाकाकांनी एक प्रयोग करण्याचे ठरवले. त्यांनी शेताजवळच्या माळावर एक मोठा गोल खड्डा खणला. त्या खड्यात पञ्याचे एक मोठे पिंप ठेवले. ते अर्धअधिक पाण्याने भरले. त्याच्या मोकळ्या तोंडावर एक तरफ़ेसारखी हलकी लांब फ़ळी बसवली. पिंपावरच्या फ़ळीच्या टोकाला तळलेली भाजी ठेवले. अंधार पडला आणि नानाकाका शेतावरुन घरी आले. सर्वञ सामसून उंदरांची टोळी बाहेर पडली. तळलेल्या भाज्यांच्या खमंग वासाने सर्वञ उंदीर पिंपापाशी धावत आले. पिंपावर ठेवलेल्या फ़ळीच्या एका टोकाला भजी ठेवलेली त्यांना दिसले. घाईघाईने तीन-चार उंदीर पुढे धावले. त्यांच्या भाराने सगळेच उंदीर पिंपाच्या पाण्यात डबकन पडले. सारे बुडून मरुन गेले.
     

 
 
सकाळी सकाळीच अधीरतेने नानाकाका पिंपापाशी आले. आपली युक्ती सफ़ल झालेली पाहून त्यांना खुप समाधान वाटले. संध्याकाळी पुन्हा खमंग भजी ठेवून नानाकाका घरी आले.
     परत दुसरा दिवशी सकाळी नानाकाका पिंपाजवळ गेले. फ़ळीवरचे भजी फ़स्त केली होती, पण पिंपामध्ये मात्र एकही उंदीर दिसला नाही. त्यांना फ़ारच आश्चयॅ वाटले. हा काय प्रकार आहे, हे त्यांनी जाणून घ्यायचे ठरवले. 

 

      संध्याकाळी अंधार पडायला सुमारास नानाकाकांनी खमंग वास सुटलेली भजी फ़ळीच्या टोकापाशी ठेवली आणि जवळच झाडाच्या आडोशाला ते लपून बसले. रात्र चांदणी होती. शांतता पसरलेली आणि उंदरांची फ़ौज स्वारीवर निघाली. सर्वञ भज्यांचा वास सुटला होता. मोठया अधीरतेने उंदीर पिंपापाशी जमले. व एक उंदीर फ़ळीवरुन पुढे सरसावला. प्रत्येकाने एक-एक करुन तेथील सर्व भजी आणली. ती सर्व भजी त्या चतुर उंदरांनी कुरतडून मजेने खाल्ली आणि पुढच्या मोहिमेवर कूच केले. शेरास सव्वाशेर भेटलेल्या त्या चतुर उंदिरमामांची युक्ती पाहून नानाकाकांनी आपल्या कपाळावर हात मारुन घेतला. 


                                *** समाप्त ***