Translate

Monday, November 5, 2018

बेकार गाव

                                बेकार गाव
     महाराष्टात एक असे नावाजले गाव आहे, की त्याचे नाव घेतले की, हसायला येते. एकदा गावात लाईट गेली होती. आणि तिही दिवाळीत. मग बाहेरच्या गावात लाईट होती. आणि मग गावातला वायरमन असुन गावातील लोकं अशीच अंधारात बसली, पण त्यांनी लाईट का गेली ? याची चौकशी केलीच नाही. त्यावेळी काही एक-दोन घरातील लोकांनी वायरमनला बोलावुन लाईट बनवली.

Saturday, November 3, 2018

मासे

                                                 मासे
   एका छोट्याशा गावात रवि नावाचा मुलगा राहत होता. तो गरिब असल्याने अभ्यासात खुप हुशार होता. एकदा शाळेत त्याचा ५वी ला प्रथम क्रमांक आल्याने त्याला शाळेतुन त्याला बक्षिस मिळाले. त्याचबरोबरच त्याला शाळेतुन स्काॅलरशिप मिळाली. तो गरीब घरातुन असल्याने त्याच्या घरातील लोकांचा मासेमारी व्यवसाय होता. त्याच्या घरात त्याचे वडील रोज नदिवर मासेमारी करायला जात होते. एकदा त्याच्या वडीलांची तबियत अचानक खराब झाल्याने रविलाच मासेमारी करायला जावे लागले. रवि नदीवर गेल्यावर त्याने मासे मारायला सुरुवात केली. २-३ तास त्याला काहीच हाती लागले नाही. अचानक एक मोठा मासा फ़सल्याचे त्याला वाटले. त्याने मासे खेचण्याचा प्रयत्न केला. पण त्याला खेचायला आलेच नाही. शेवटी त्याला जाताना माणसे दिसली. त्यांना त्याने हाक दिली. त्या माणसांनी मासा खेचण्याचा प्रयत्न केला. तर एक मोठा ३० किलोचा मासा त्याला मिळाला. तेव्हा त्याने तो मासा बाजारात विकला. तर त्याला खुप पैसे मिळाले. मग ते पैसे घेऊन तो घरी गेला. तर घरात वडील खुप खुश झाले.

Friday, November 2, 2018

मुंगुस

                                      मुंगुस
    एक विश्वास नावाचा मुलगा होता. तो नुकताच १०वी ला होता. शाळेत गेल्यावर मुलांशी मस्ती आणि सरांचा मार खाणे असा त्याचा स्वभाव असला तरी घरात त्याची वागणुक चांगली होती. एकदा असाच शाळेतुन घरी जात होता. अचानक त्याला रस्त्यात एक मोठा मुंगुस दिसला. मुंगुस बघताच तो थोडा घाबरला, तो मुंगुस १० मी. तिथेच असल्याने त्याला वाटले की, तो कुणाच्यातरी शोधात आहे. असे त्याला वाटले, मग मुंगुस गेल्यावर तो घरी गेला. घरी गेल्यावर घराच्या बाजुला लोकांची गर्दी जमली. त्याने घरात पाहुण बघितले तर, घरात रक्ताचे डाग होते. आणि किच्चनच्या रुममध्ये रक्ताचे प्रमाण जास्त असल्याने त्याने पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याने पाहिले तर तो तिथेच हादरला. " एक मोठा साप मरुण पडला आहे, आणि त्याचे रक्त सगळीकडे पाणगले आहे." तेव्हा बाजुचे काका घरात आले. मग त्यांनी त्याला सांगितले की तुझ्या घरात साप घुसलेला, आणि त्या सापाच्या मागे एक मुंगुस होता. त्या मुंगुसाने त्याला मारले असावे, असा अंदाज होता. तेव्हा विश्वासला लगेच लक्षात आले की आपण रस्त्यात जो मुंगुस बघितलेला होता. तो तोच होता म्हणुन. मग घरात कोणीच नसल्याने घरातुन साप बाहेर काढला, व पुर्ण घर साप केले. मग घरात त्याची आई आल्यावर झालेला प्रकार त्याने सांगितला.

Thursday, November 1, 2018

घोण

                                       घोण 
       एका लहानशा खेडेगावात करण नावाचा एक मुलगा राहत होता. तो तिसरीमध्ये शिकत होता. सकाळी १० वा. शाळेत गेल्यावर दुपारी २ वा. घरी जेवायला यायचा आणि जेवुन लगेच शाळेत जायचा. ५.५० वा. शाळा सुटली की तो घरी यायचा. घरी आई-बाबा, एक लहान बहिण २ वर्षाची. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेल्यावर दुपारी जेवायला घरी आला. जेवायला आल्यावर आईने जेवणाचे ताट वाढले, आणि आई बाहेर गेली. तेथे त्याची छोटी बहिण खेळत होती. अचानक तिथे एक मोठी घोण आली. मग हे करणने बघितले, मग करणने त्या घोणचा रस्ता आडवण्याचा खुप प्रयत्न केला. पण ती घोण थांबतच नव्हती. सारखी पुढे येत होती. मग घरात एक मोठी काठी होती. त्या काठीने त्या घोणला मारले. त्या घोणचे दोन तुकडे केले, तरीही ती जिवंत असल्याचे त्याला आढळले. मग त्याने बतितले राॅकल त्या घोणवर ओतले आणि आग लावली. तेवढयात त्याची आई आली आणि म्हणाली, काय पेटवलेस ? मग तो बोल्ला की घोण आहे. हे बोलताच तो शाळेत गेला. शाळेत गेल्यावर हा प्रकार मित्रांना सांगितला तर मित्रांनी त्याची वाह ! वाह ! केली.

Wednesday, October 31, 2018

माणुस्की

                                            माणुस्की
   एकदा एका बाईचा रस्त्यावर निधन झाले. तेव्हा त्या बाईला बघण्यासाठी खुप लोक आली होते. एवढे लोक होते की, एखादा हिरोला बघायला जेवढी माणसे असतील तेवढी इथे होती. तेव्हा गावातील खुप लोक तेथे आले होते. मग तिची पुर्ण क्रिया होपर्यत माणसे तिथेच होती. त्या बाईची मुले होती. त्या मुलांना तिच आधार होती. आणि तिच त्यांना सोडुन गेल्यामुळे लोकांमध्ये चर्चेचे वातावरण निर्माण झाले. मग तेव्हा त्या मुलांना काही माणसांनी धिर दिला. मग तेथे एक बाई म्हणाली की, ही बाई माणस्कीला खुप चांगली होती. शेवटी राहिली ती, त्या बाईची माणुस्की..
    

            *** समाप्त ***

Tuesday, October 30, 2018

पुरस्कार

                                             पुरस्कार 
रावेल नावाचे एक गाव होते. त्या गावात एकदा निबंधाची स्पर्धा होती. त्या स्पर्धेत अट अशी होती की, एक शब्द चुकला की परत सुरुवातपासुन चालु करणे. मग स्पर्धेत १५०० लोकांनी भाग घेतला होता. त्यात १००० मुले तर  ५०० माणसांचा समावेश होता. मग हि स्पर्धा ९ वाजता सुरुवात झाली. त्यात वेळ १ तासाची होती. मग त्यात शेवटी एक मुलगा जिकला. मग त्याला ग्रामसेवकाने पुरस्कार जाहिर केला.