Translate

Wednesday, October 17, 2018

मोबाईल (एक अपघात)

        

   एक बोरीवली नावाचे शहर होते. त्या शहरामध्ये एक मयुर नावाचा मुलगा राहत होता.  त्याला १० वीत ६५% गुण मिळाल्यामुळे त्याचे अॅडमिशन एका कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमध्ये त्याचे नवीन मित्र झाले. काही मित्रांकडे मोबाईल होते
 
 त्यामुळे त्यालाही वाटत होते की, आपल्याकडे मोबाईल असावा. मग त्यादिवशी त्याने आपल्या वडिलांकडे मोबाईलची मागणी केली. पण वडिलांनी त्याला मोबाईलसाठी नकार दिला. मग त्याने विचार केला की काम करुन मोबाईल घ्यायचा. तो अंधेरीमध्ये रोज कॉलेजला जायचा त्यामुळे त्याचा लोकलने प्रवास होत असे.
   एकेदिवशी कॉलेजमधुन निघायला उशीर झाल्यामुळे त्याने चालत्या लोकलला पकडण्याचा प्रयत्न केला. आणि त्याने ती लोकल पकडली. कारण समोरच्या एका प्रवाशाने त्याचे हात पकडल्यामुळे तो लोकल पकडू शकला; मग त्यादिवशीचा लोकलचा प्रवास त्याने घरात कुणालाच सांगितला नाही.
  
 काही दिवसानी तो एक छोटेमोठे अर्धदिवसाचे काम करु लागला. आणि त्याच्याकडे मोबाईल घेण्याइतके पैसे झाल्याने त्याने विचार केला की मोबाईल कॉलेज सुटल्यावर एका चांगल्या दुकानातुन घ्यायचा. मग दुसरा दिवशी तो मोबाईलच्या दुकानातुन बाहेर येताना त्याला लक्षात आले की खुप वेळ झाला आहे, आता लवकरात लवकर घरी गेले पाहिजे. त्यामुळे त्याने घरी जाण्यासाठी धाव घेतली. स्टेशनवर पोचल्यावर त्याची लोकल सुटताना त्याला दिसला. त्याने जोरात लोकलकडे धाव घेतली. लोकलचा लोखंडी खांब त्याने जोरात पकडल्याने तो लोकलमध्ये चढला पण त्याची पक्कड घट्ट नव्हती. कारण एका हातात मोबाईल असल्याने त्याची पकड सैल होती. अचानक त्याच्या हातातुन मोबाईल रेलवेच्या बाहेर पडला. मोबाईल पडताच त्याने लोकलमधुन उडी मारली. उडी मारल्यामुळे पडलेला मोबाईल मिळाला पण अचानक समोरुन लोकल आली आणि त्याचे जागीच  

प्राण गेले. तेव्हा लोकलमधील त्याचे काही मित्र त्याला शोधत येताना त्याचे शरिर त्यांना मिळाले. त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवले

 त्यावेळी त्याचा एक मित्र तेथे म्हटला की जर त्याच्या हातात मोबाईल नसता तर, हा प्रसंग बघायला मिळालाच नसता..

                                           *** समाप्त ***

Tuesday, October 16, 2018

धाडसी रोशन

        

    पालघर तालुक्यातील नालासोपारा गावात एक रोशन नावाने मुलगा राहत होता. त्याचे शिक्षण १५ वी पास असल्याने त्याला गोरेगावात एका मोठया कंपनीत नोकरी मिळाली
 
 त्याचे काम बघुन ऑफ़िसमधले सर्वजण त्याला ओळखु लागले.   मुळात तो मे महिन्यात कामाला लागल्याने च्याचे काम कंपनीच्या मालकाला एवढे आवडले. की त्याला कंपनीच्या मालकाने बोलावुन त्याची स्वतंत्र भेट घेतली त्याचे कौतुक केले. त्यामुळे ऑफ़िसमधले त्याचे एक व्यक्तीचित्र तयार झाले. आणि तो सगळयांचा आवडता झाला.
रोज सकाळी :०० वाजता उठून मग :१० मी. स्टेशनवर पोहचायचे आणि .२० ची अंधेरी लोकल   पकडून ऑफ़िसमध्ये :३० ला पोहचणे. 
आणि ऑफ़िसमध्ये पोचल्यावर मग ऑफ़िसची कामे करुन :३० ला सुटून :५० ची लोकल पकडावी लागे. लोकलला प्रचंड गर्दी असतानाही कसेबसे घरी पोहचणे. असा त्याचा रोजचा दिनचक्र होता. जुनचा महिना लागला आणि पाऊसाला सुरुवात झाली. रोज सकाळ संध्याकाळ पाऊस पडल्याने प्रवासात त्रास होत असे.
 एका दिवशी रात्रभर भरपुर पाऊस पडला त्यामुळे सकाळीच रेलवे स्टेशनवर भरपुर पाऊसाचे पाणी साचले.  
 
तरीही कामाला जाणार कसे ? हा प्रश्न त्याला पडला. मग कसेबसे पाण्यातुन चालत जाऊन  रेलवे स्टेशनवर पोहचला. पण तेथे पोहचल्यावर त्याला कळले की गाड्या २० मी. उशीराने धावत आहेत. तरीही त्याने ऑफ़िसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. आणि तो ऑफ़िसमध्ये :३० मी पोहचला

  ऑफ़िसमध्ये बहुतेकजण आलेच नाही तरीही त्याने आपले कामाच्या जबाबदारीमुळे हे सर्व केले. नंतर ऑफ़िसमधुन बाहेर आल्यावर स्टेशनवरुन लोकल पकडली. नालासोपारा स्टेशनला पोहचल्यावर पायभर पाणी. मग कसेबसे घराचा रस्ता बघितला आणि इतर प्रवाशींसोबत जाऊ लागला. रस्त्यात प्रवाशी कमी होऊ लागले. रस्त्याने तो एक्टाच होता. अचानक जोराचा वारा आणि पाऊस सुरु झाला. वारामुळे विजेची तार तुटून रस्त्यावर पडली. त्याने आजुबाजुला पाहिले तर त्याला इतर ठिकाणी विजेची बल्प चालु असलेले त्याच्या नजरेस आले.  
 
तेव्हा त्याने त्याक्षणी विज-ऑफ़िसला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण कॉल लागला नाही. अचानक गॅस-सिलेंडरची गाडी पाण्यातुन येताना दिसली. त्याने विचार केला की जर की विज बंद कशी करावी, तेव्हा त्याला आठवले की रस्त्यात विजेचा डेपो होता. मग कसाबसा कडेकडेनी जाऊन त्याने विज बंद केली




 त्यावेळेस रस्यावरची लोकं त्याला पाहत होती पण त्यांना हे माहीत नव्हते की पुढच्या रस्त्यावर विजेची तार पडली आहे. मग जेव्हा लोकांना कळले की विजेची तार पडल्यामुळे त्याने विज बंद केली. हे कळल्यावर गावातील लोकांनी त्याचे कौतुक केले. आणि दुसरा दिवशी गावातील सरपंचानी त्याचे कौतुक करुन त्याचा सत्कार केला. ऑफ़िसमध्येही त्याचे भरभरुन सर्वांनी कौतुक केले.


                                         *** समाप्त ***

Monday, October 15, 2018

जंगलातील फ़ुले (एक करमणूक)

  रायगड जिल्यातील कर्जत तालुक्यातील एका गावात मी गेलो. त्या गावाच्या सुरुवातीस जंगलाचा रस्ता लागला. रस्त्यात मला वेगवेगळ्या प्रकारची फ़ुले होती.
  त्यात पहिले फ़ुलतर पिवळ्या रंगाचे. दिसायला आकर्षक व सुगंध नसनारा.


 
   दुसरे फ़ुल म्हणजे ते एका नारळाच्या कवटीसारखे आणि त्यात पावसाचे पाणी पडल्यावर त्याची सुंदरता शोभून दिसते.



  तिसरे फ़ुल म्हणजेच नुकतेच मोगराच्या फ़ुलासारखे दिसत होते. पण ते फ़ुल सफ़ेद रंगाचे होते.  पण त्याचा सुगंध नव्हता.


     असे खुप वेगवेगळ्या प्रकारची फ़ुले मी तिथे पाहिली. आणि नंतर मी तिथून निघुन आलो.
 
                                                       *** समाप्त ***

Sunday, October 14, 2018

पक्के मित्र (एक काल्पनिक कथा)

      एक अनगाव नावाचे गाव होते. त्या गावात दोन मित्र होती. एका मित्राचे नाव दत्ता तर दुसरा मित्राचे नाव राहुल होते.
 

 ते दोघे एका वर्गात शिकत असताना त्यांची एकमेकांवर जिवापाड मैत्री होती.
 

 एकदा वार्षिक परिक्षा जवळ आली. दोघे अभ्यासात हुशार असताना दत्ता हुशार तर राहुल हुशार नव्हता पण परिक्षा आली की परिक्षेत कॉपी करायची तिही सरांच्या न कळत. मग परिक्षेचा पहिला दिवस आणि दोघे पेपर द्यायला बसले. पेपर लिहताना अचानक दत्ताकडे कॉपी सापडली.
 

         ती कॉपी राहुलची असताना राहुलने दत्ताचे मुद्दावून नाव घेतले नाही. तरीही दत्तावर कॉपी करायचा आरोप लागला.तेव्हा दत्ताला भरपुर राग आला आणि तेव्हापासुने दत्ताने राहुलची मैत्री तोडली.
  एके दिवशी दत्ताला शाळेत जायला उशीर झाला म्हणून दत्ताने वडिलांची गाडी घेतली. शाळेत येताना राहुललाही उशीर झालेला. कारण शाळा सकाळची होती.
 

       मग शाळेत येताना रस्त्यात दत्ताच्या गाडीचा अॅक्सिडन झालेला दिसला. राहुलने दत्ताला वेळीच दवाखान्यात पोचवले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले पण दत्ता जेव्हा शुधिवर आला तेव्हा हा सर्व प्रकार त्याच्या वडीलांनी सांगितला
 

       तेव्हा दत्ता राहुलला भेटायला गेला. मग त्यादिवशीचा सर्व प्रकार राहुलने सांगितला. तेव्हा दत्ताचा राग शांत झाला पण दत्ताला हे माहित नव्हते की त्याला राहुलने वाचवले होते. मग त्यावेळी दत्ताचे वडिल तेथे आले आणि त्याला जेव्हा आपले प्राण वाचवल्याचे कळले, तेव्हा त्याच्या डोळयात पाणी आले.


   आणि त्यानी राहुलचे आभार व माफ़ी मागितली. मग त्यादिवशीपासून दोघे पक्के मित्र झाले.


                                         *** समाप्त ***

Saturday, October 13, 2018

पाटिल बंधू ( एक रिक्शावाला )

              रत्नागिरी जिल्यातील पावस नावाचे एक गाव होते. त्या गावात दिपक पाटील नावाने एक रिक्शावाला राहत होते. त्याला गावातील सर्व लोक पाटील बंधू असे म्हणत. पाटील गावात एकटेच होते. ते १५वीत असताना आई-वडीलांचे बस अपघातात दु:खद निधन झाले.  तेव्हा ते नुकतेच २२ वर्षाचे होते. ते नोकरीच्या शोधात मुंबईला एकदा-दोनदा जाऊन आले पण हवी तशी नोकरी मिळालीच नाही म्हणून जबरदस्तीने त्याला रिक्शा चालवावी लागली.
    एकदा गावात एक नविन पाहुणे आले होते. तेव्हा पाटिलांनी त्यांना बसस्टॅापवरुन गावात आणले. गावात आल्यावर पाटिलांनी प्रवासींचे सर्व सामान रिक्शातुन बाहेर ठेवले आणि पाटिल तिथुन निघुन गेले.



 कारण हे गाव पावस गावापासुन २० कि.मी अंतरावर होते. म्हणून पाटलांनी प्रवाशींकडे घाई करुन त्यांच्याकडून पैसे घेतले आणि तिथून निघुन गेले. पाटील गेल्यावर प्रवाशांनी त्यांचे सर्व सामान घरात घेताना एक बॅग तर रिक्शातच राहिली. मग आता ती बॅग आता कशी मिळेल, या चिंतेने ही बाब पुर्ण गावभर पसरली. गावातल्या काही लोकांनी पाटिलला आलेले पाहिले होते. त्यावेळी त्यांनी पाटीलांबद्दल काहीच सांगितले नाही. गावात पाहुणी नविन असल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनादेखिल पाटीलांबद्दल काहीच माहीत नव्हते. म्हणून पाटलांवर नुकताच संशय घेतला. दुसरा दिवशी पाटिल गावात आले तेव्हा त्या प्रवाशांनी त्यांना पाहताच शिवीगाळ करायला सुरुवात केली. पाटील बॅग परत करायला आले आहेत हे त्यांना माहितच नव्हते. पाटलांना हा प्रकार आवडला नाही म्हणून पाटलांना कडक आवाजात म्हटले,

 
  " तुमची वस्तु परत करायला आलो आणि तुम्ही माणसाला न आेळखता त्यावर आरोप कसा लावू शकता ?" लगेचच पाटलांनी रिक्शातून बॅग आणली आणि घरात प्रवाशीला दिली. बॅग देताच घरातील सर्वाचा राग शनातच गायब झाला. मग प्रवाशींनी पाटलांची माफी मागितली.


                                         *** समारोप ***